Mumbai Local: Coronavirus ने वाढवले मध्य रेल्वेचे टेंशन; तिकीट बुकिंग कर्मचाऱ्यालाच कोरोनाची लागण

मुंबईत सुमारे 74 लाखांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. ठाणे, वसई-विरार, उल्हासनगर, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर महापालिकेची आकडेवारी जोडली तर महानगरातील एक कोटीहून अधिक लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: PTI)

कोरोनाच्या (Coronavirus) वाढत्या प्रकरणांमुळे रेल्वेच्या समस्याही वाढल्या आहेत. ट्रेनचे संचालन आणि देखभालीमध्ये गुंतलेल्या लोकांचे आरोग्य हा रेल्वेसाठी चिंतेचा विषय बनला आहे. सध्या, सुमारे 60 लाखाहून अधिक लोक मुंबई लोकलने (Mumbai Local) प्रवास करत आहेत, ज्यांच्यासाठी रेल्वे जवळपास 100% सेवा चालवत आहे. या सेवांसाठी रेल्वेचे कर्मचारी देखील मोठ्या प्रमाणावर तैनात आहेत, परंतु त्यापैकी काहींना कोरोनाची लागण झाल्याने भीती निर्माण झाली आहे. नुकतेच बोरीवली (Borivali) स्थानकातील तिकीट बुकिंग कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी सकारात्मक आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी बोरीवली स्थानकात एका बुकिंग क्लार्कला काहीसा त्रास होऊ लागला. स्टेशनवर उपस्थित असलेल्या बीएमसी कर्मचाऱ्यांनी त्याची अँटीजेन चाचणी केली तेव्हा त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यानंतर नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली, त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली, ज्यांचा आरटीपीसीआर अहवाल येणे बाकी आहे. महत्वाचे म्हणजे या कर्मचाऱ्याने प्रवाशांना तिकिटे दिली असतील तर त्यांचे ट्रेसिंग कसे होणार, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. (हेही वाचा: Mumbai मध्ये लागू असलेल्या कलम 144 अंतर्गत जमावबंदीच्या नियमांना 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ; संध्याकाळी 5 ते सकाळी 5 पर्यंत 'या' ठिकाणी जाण्याला नागरिकांना मज्जाव)

मध्य रेल्वेमध्ये सुमारे एक लाख कर्मचारी आहेत, त्यापैकी 85% जणांना सध्या लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. मुंबई विभागात 31,899 कर्मचारी आहेत, त्यापैकी 77 टक्के कर्मचाऱ्यांना दोन्ही डोस मिळाले आहेत. मध्य रेल्वेचा दावा आहे की, मुंबई विभागातील 98 टक्के कर्मचाऱ्यांना एकच डोस मिळाला आहे. पश्चिम रेल्वेच्या 98 टक्के कर्मचाऱ्यांनी दोन्ही डोस घेतले आहेत. 99% मोटरमननी एकच डोस घेतला आहे, तर 92% गार्डसनी लसीचा पहिला डोस घेतला आहे.

बीएमसीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 83 टक्के मुंबईकरांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. मुंबईत सुमारे 74 लाखांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. ठाणे, वसई-विरार, उल्हासनगर, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर महापालिकेची आकडेवारी जोडली तर महानगरातील एक कोटीहून अधिक लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. त्याचा थेट परिणाम मुंबईच्या लोकल ट्रेनवर दिसून येत आहे. मुंबई लोकल ट्रेनमधून सुमारे 65 लाख प्रवासी प्रवास करत आहेत.