Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 1,929 रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 1,52,024 वर
आज शहरामध्ये तब्बल 1,929 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत, यासह एकूण संक्रमितांची संख्या 1,52,024 वर पोहोचली आहे.
मुंबई (Mumbai) मध्ये आज कोरोना विषाणू (Coronavirus) रुग्णांच्या संख्येत चांगलीच वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आज शहरामध्ये तब्बल 1,929 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत, यासह एकूण संक्रमितांची संख्या 1,52,024 वर पोहोचली आहे. आज मुंबईमध्ये 1,110 कोरोनाचे रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत एकूण 1,21,671 रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्येमध्ये वाढ होत असल्याने, सध्या मुंबईमध्ये 22,220 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज शहरामध्ये कोरोनाच्या 35 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत 7,796 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बीएमसीने (BMC) याबाबत माहिती दिली.
आज शहरामध्ये मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 28 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील 25 रुग्ण पुरुष व 10 रुग्ण महिला होत्या. 25 जणांचे वय 60 वर्षा वर होते, तर उर्वरित 10 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. सध्या मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर 80 टक्के आहे. 28 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 0.90 टक्के राहिला आहे. 3 सप्टेंबर 2020 पर्यंत झालेल्या कोविडच्या एकूण चाचण्या 8,02,647 इतक्या आहेत. यासह मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर 77 दिवसांवर आला आहे. (हेही वाचा: महाराष्ट्रात आज कोरोनाचे आणखी 19,218 रुग्णांची नोंद तर 387 जणांचा बळी; राज्यातील COVID19 चा आकडा 8,63,062 वर पोहचला)
बीएमसी ट्वीट -
शहरामधील प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून, 3 सप्टेंबर नुसार सक्रिय कंटेनमेंट झोन (झोपडपट्ट्या आणि चाळी) ची संख्या 560 आहे, तर सक्रिय सीलबंद इमारती 6,797 आहेत. दरम्यान, नवी मुंबईचे (Navi Mumbai) माजी पोलीस आयुक्त संजय कुमार (Sanjay Kumar) यांची कोरोनाची चाचणी शुक्रवारी पॉझिटिव्ह आली आहे. संजय कुमार यांची बदली करत त्यांना ADG पदभार देण्यात आला आहे. दुसरीकडे महाराष्ट्र पावसाळी अधिवेशनाच्या 2 दिवस आधी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे.