Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 1708 रुग्णांची नोंद; सध्या 13,247 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु

दिवसेंदिवस हा आकडा वाढत असताना मुंबईमधील (Mumbai) परिस्थितीही चिंताजनक होत आहे. आज मुंबईमध्ये कोरोनाच्या 1708 रुग्णांची नोंद झाली असून, एकूण बाधित रुग्णसंख्या 341985 वर पोहोचली आहे.

Medical Workers (Photo Credits: IANS)

आज महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) कोरोना विषाणू (Coronavirus) 15602 रुग्ण आढळून आले. दिवसेंदिवस हा आकडा वाढत असताना मुंबईमधील (Mumbai) परिस्थितीही चिंताजनक होत आहे. आज मुंबईमध्ये कोरोनाच्या 1708 रुग्णांची नोंद झाली असून, एकूण बाधित रुग्णसंख्या 341985 वर पोहोचली आहे. आज कोविड आजाराचे बरे झालेले रुग्ण हे 941 इतके होते व आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 316320 इतकी आहे. सध्या शहरात्त एकूण सक्रिय रुग्णसंख्या 13247 झाली आहे. आज शहरात 5 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत 11524 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 3 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. यातील 4 रुग्ण पुरुष व 1 रुग्ण महिला होते. यातील एकाचे वय 60 वर्षा वर होते. तर उर्वरित 4 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. सध्या मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर 92 टक्के आहे. 6 मार्च ते 12 मार्च 2021 पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 0.3 होता. 12 मार्च 2021 पर्यंत झालेल्या कोविडच्या एकूण चाचण्या 35,37,664 इतक्या होत्या. मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर आता 186 दिवसांवर आला आहे.

(हेही वाचा: Night Curfew in Beed: बीड जिल्ह्यात नाईट कर्फ्यू लागू, काय असतील महत्त्वाचे नियम?)

शहरातील प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून, 12 मार्च नुसार सक्रिय कंटेनमेंट झोन (झोपडपट्ट्या आणि चाळी) ची संख्या 31 आहे व सक्रिय सीलबंद इमारती 220 आहेत. दरम्यान, राज्यात आज 15602 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 7467 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2125211 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 118525 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.49% झाले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif