Coronavirus In Mumbai: अंधेरीच्या Radha Krishna Restaurant मध्ये 10 कर्मचारी कोविड 19 बाधित; बीकेसी जम्बो कोविड सेंटर मध्ये रवानगी
तर 5 जणांचा बळी गेला होता.
मुंबई मध्ये लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर पुन्हा कोरोना रूग्ण वाढत आहेत. नुकत्याच अंधेरी (Andheri) पश्चिम येथील एसव्ही रोड (SV Road) येथील राधे कृष्ण रेस्ट्रॉरंट (Radha Krishna Restaurant )मध्ये 10 कर्मचार्यांची कोविड चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. या दहाही कर्मचार्यांना सध्या मुंबई मधील बीकेसी जम्बो कोविड सेंटर मध्ये हलवण्यात आले आहे. अशी माहिती बीएमसी कडून देण्यात आली आहे. आठवड्याभरापूर्वी मीरा-भाईंदर महापालिकेकडून Hotel Express Inn देखील त्यांचे 21 कर्मचारी कोविड पॉझिटीव्ह आल्याने सील करण्यात आले होते. मुंबई मध्ये अनेक ठिकाणी कोविड 19 चे नियम धाब्यावर बसवत पब्स रात्री उशिरापर्यंत सुरूच.
मुंबई मध्ये काल मागील 24 तासांत 1103 नव्या कोरोना रूग्णांचे निदान झाले होते. तर 5 जणांचा बळी गेला होता. महाराष्ट्रातही काल एकूण 8998 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली तर 6135 कोरोना बाधित रुग्ण बरे झाल्याची माहिती देण्यात आली आहे. (नक्की वाचा: Covid-19 Vaccine: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची लस का घेतील नाही? महत्वाची माहिती आली समोर)
ANI Tweet
भारतामध्ये लॉकडाऊनचे नियम शिथिल झाले आहेत सोबतच लसीकरण सुरू झाले असल्याने आता नागरिकांमध्ये थोडा बेफिकीरपणा वाढला आहे. दरम्यान वांद्रे येथे काल एका पंचतारांकित हॉटेलमध्येही हायजिनशी निगडीत काही नियमांची पायमल्ली होत असल्याचं लक्षात आल्यानंतर FDA ने हॉटेलचे किचन सील केले आहे. सध्या FDA कडून धाडी टाकून कोविड 19 गाईडलाईन्स पाळल्या जात आहेत की नाही हे तपासलं जात आहे.