Coronavirus In Maharashtra: राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या पोहचली 4483 वर; मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई- विरार मध्ये सर्वाधिक रुग्ण

मागील 12 तासात महाराष्ट्रात 283 नवीन रुग्ण आढळून आले आहेत, यापैकी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सर्वाधिक म्हणजेच 187 रुग्णांची वाढ झाली आहे तर, वसई विरार मध्ये 22, ठाणे येथे 21, कल्याण- डोंबिवली मध्ये 16 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे.

Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Coronavirus Outbreak In Maharashtra:  महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त (Coronavirus In Maharashtra) रुग्णांच्या आकडेवारीत आता पुन्हा नव्याने वाढ झाली आहे, मागील 12 तासात महाराष्ट्रात 283 नवीन रुग्ण आढळून आले आहेत, यापैकी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सर्वाधिक म्हणजेच 187 रुग्णांची वाढ झाली आहे तर, वसई विरार मध्ये 22, ठाणे येथे 21, कल्याण- डोंबिवली मध्ये 16 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. यासोबतच राज्यातील रुग्णांची संख्या ही 4483 वर पोहचली आहे.यात भिवंडी 1, मीरा भाईंदर 7,नागपूर 1,नवी मुंबई 9,पनवेल 6,पिंपरी चिंचवड 9,रायगड 2,सातारा 1,सोलापूर 1,अशी आकडेवारी दिसून येत आहेत. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope)  यांनी ट्विट च्या माध्यमातून माहिती दिली आहे. Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण? पहा COVID-19 पॉझिटीव्ह रुग्णांची जिल्हानिहाय यादी

आजपासून महाराष्ट्रात लॉक डाऊनचे काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. यानुसार जिल्ह्याच्या अंतर्गत व्यवसायाला परवानगी देण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीय महामार्गावर टोलवसुलीला सुद्धा सुरुवात झाली आहे. आज सकाळी वाशी टोलनाक्याजवळ यामुळे वाहनांची मोठी गर्दी दिसून आली होती.

राजेश टोपे ट्विट

दरम्यान, मागील 24 तासात कोरोना पॉझिटिव्ह अशी 1553 नवी प्रकरणे व 36 मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यानुसार कोरोनाच्या रुग्णांची आकडेवारी पाहता आज, 20 एप्रिल पर्यंत देशभरात तब्बल 17,265 कोरोना रुग्ण असल्याचे समजत आहेत. यापैकी 14175 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत, 543 जणांचा कोरोनाच्या जीवघेण्या विषाणूमुळे मृत्यू झाला आहे तर 2,547 जणांचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आले आहे.