Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात कोविड-19 चे किती रुग्ण? जाणून घ्या कोरोना बाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी एका क्लिकवर

त्यामुळे या महत्त्वाच्या शहरांसह राज्याच्या विविध जिल्ह्यात कोरोना व्हायरस रुग्णसंख्या, मृतांचा आकडा किती आहे जाणून घेऊया.

Coronavirus | (Photo Credits: Pixabay.com)

देशासह महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. दरदिवशी कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी भर पडत आहे. राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 94,041 वर पोहचला आहे. राज्यातील आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 94,041 पैकी 44,517 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यात सध्या 46074 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 3438 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी एकट्या मुंबईत कोरोनाचे 52667 रुग्ण आहेत. दरम्यान मुंबईतील मृत्यू दर कमी झाला असून डबलिंग रेट आणि रिकव्हरी रेटही सुधारला असल्याची माहिती समोर आली आहे. (Coronavirus in India: भारतात मागील 24 तासांत कोविड-19 चे 9996 नवे रुग्ण तर 357 रुग्णांचा मृत्यू; देशातील कोरोना बाधितांचा आकडा 286579 वर)

मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक या शहारांमध्ये कोरोना व्हायरसचा प्रभाव अधिक आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या शहरांसह राज्याच्या विविध जिल्ह्यात कोरोना व्हायरस रुग्णसंख्या, मृतांचा आकडा किती आहे जाणून घेऊया. कोरोना रुग्णांची जिल्हा आणि मनपा निहाय आकडेवारी ही महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरुन देण्यात आली आहे. ही आकडेवारी 10 जून सायंकाळी 6 वाजेपर्यंतची आहे.

COVID-19 पॉझिटीव्ह रुग्णांची जिल्हा/मनपा निहाय यादी:

अ.क्र. जिल्हा/मनपा बाधित रुग्ण मृत्यू
1 मुंबई मनपा 52667 1857
2 ठाणे 1384 23
3 ठाणे मनपा 5319 146
4 नवी मुंबई मनपा 3895 92
5 कल्याण डोंबिवली मनपा 2082 36
6 उल्हासनगर मनपा 629 24
7 भिवंडी निजामपूर मनपा 368 12
8 मीरा भाईंदर 1043 45
9 पालघर 251 6
10 वसई विरार मनपा 1487 37
11 रायगड 783 29
12 पनवेल मनपा 792 29
ठाणे मंडळ एकूण 70700 2338
1 नाशिक 273 8
2 नाशिक मनपा 570 22
3 मालेगाव मनपा 861 65
4 अहमदनगर 166 8
5 अहमदनगर मनपा 54 1
6 धुळे 131 13
7 धुळे मनपा 203 12
8 जळगाव 980 105
9 जळगाव मनपा 308 15
10 नंदुरबार 44 4
नाशिक मंडळ एकूण 3590 553
1 पुणे 716 17
2 पुणे मनपा 8970 405
3 पिंपरी-चिंचवड मनपा 720 17
4 सोलापूर 99 7
5 सोलापूर मनपा 1384 105
6 सातारा 661 27
पुणे मंडळ एकूण 12570 578
1 कोल्हापूर 664 8
2 कोल्हापूर मनपा 27 0
3 सांगली 175 3
4 सांगली मिरज कुपवाड मनपा 13 1
5 सिंधुदुर्ग 133 0
6 रत्नागिरी 381 14
कोल्हापूर मंडळ एकूण 1373 26
1 औरंगाबाद 65 2
2 औरंगाबाद मनपा 2108 115
3 जालना 225 5
4 हिंगोली 214 0
5 परभणी 55 3
6 परभणी मनपा 25 0
औरंगाबाद मंडळ एकूण 2692 125
1 लातूर 112 4
2 लातूर मनपा 35 0
3 उस्मानाबाद 140 3
5 बीड 63 2
6 नांदेड 34 1
7 नांदेड मनपा 140 7
लातूर मंडळ एकूण 524 17
1 अकोला 54 6
2 अकोला मनपा 828 34
3 अमरावती 22 2
4 अमवरावती मनपा 283 18
5 यवतमाळ 168 2
6 बुलढाणा 98 3
7 वाशीम 14 2
अकोला मंडळ एकूण 1467 67
1 नागपूर 55 0
2 नागपूर मनपा 776 12
3 वर्धा 14 1
4 भंडारा 42 0
5 गोंदिया 68 0
6 चंद्रपूर 30 0
7 चंद्रपूर मनपा 15 0
8 गडचिरोली 45 0
नागपूर मंडळ एकूण 1045 14
1 इतर राज्य 80 20
एकूण 94041 3438

अनलॉक 1 च्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने जनजीवन पूर्वपदावर येत आहे. दरम्यान अजूनही संकट टळलेलं नाही. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये देण्यात आलेली शिथीलता जीवघेणी होत असल्यास पुन्हा कडक लॉकडाऊन करण्यात येईल, असा गंभीर इशारा देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत जनतेला दिला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif