Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी; तुमच्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण? घ्या जाणून

महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून राज्याच्या विविध जिल्ह्यात कोरोना व्हायरस रुग्णसंख्या, मृतांचा आकडा किती आहे जाणून घेऊया...

Coronavirus (Photo Credits- IANS)

भारतात कोरोना व्हायरसचे (Coronavirus) दाहक रुप पाहायला मिळत आहे. देशातील कोरोना बाधितांचा आकडा 1 लाख 51 हजारच्या वर गेला आहे. तर कोरोना बाधितांच्या संख्येत महाराष्ट्र (Maharashtra) राज्य प्रथमस्थानी आहे. महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 54758 वर पोहचला असून त्यापैकी 36004 रुग्णांवर अद्याप उपचार सुरु आहेत. त्यापैकी 16954 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 1792 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, ठाणे, औरंगाबाद, नाशिक या शहर/जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. कोरोना व्हायरसचा वेढा दिवसेंदिवस मजबूत होत असून येत्या काळात रुग्णसंख्या अधिक वाढेल, असा इशाराही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वी जनतेशी संवाद साधताना दिला आहे. (देशातील कोरोना अपडेट्स जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.)

दरम्यान महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून राज्याच्या विविध जिल्ह्यात कोरोना व्हायरस रुग्णसंख्या, मृतांचा आकडा किती आहे जाणून घेऊया. कोरोना रुग्णांची जिल्हा आणि मनपा निहाय आकडेवारी ही महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरुन देण्यात आली आहे. ही आकडेवारी 26 मे सायंकाळी 6 वाजेपर्यंतची आहे.

COVID-19 पॉझिटीव्ह रुग्णांची जिल्हा/मनपा निहाय यादी:

अ.क्र. जिल्हा/मनपा बाधित रुग्ण मृत्यू
1 मुंबई मनपा 32974 1065
2 ठाणे 484 5
3 ठाणे मनपा 2866 52
4 नवी मुंबई मनपा 2154 32
5 कल्याण डोंबिवली मनपा 989 18
6 उल्हासनगर मनपा 198 6
7 भिवंडी निजामपूर मनपा 99 3
8 मीरा भाईंदर 525 10
9 पालघर 122 3
10 वसई विरार मनपा 630 15
11 रायगड 471 5
12 पनवेल मनपा 374 12
ठाणे मंडळ एकूण 41886 1226
1 नाशिक 123 0
2 नाशिक मनपा 147 2
3 मालेगाव मनपा 722 47
4 अहमदनगर 64 5
5 अहमदनगर मनपा 20 0
6 धुळे 29 3
7 धुळे मनपा 100 6
8 जळगाव 324 36
9 जळगाव मनपा 123 5
10 नंदुरबार 32 2
नाशिक मंडळ एकूण 1684 106
1 पुणे 383 7
2 पुणे मनपा 5602 268
3 पिंपरी-चिंचवड मनपा 350 7
4 सोलापूर 25 2
5 सोलापूर मनपा 621 47
6 सातारा 339 5
पुणे मंडळ एकुण 7320 336
1 कोल्हापूर 312 1
2 कोल्हापूर मनपा 28 0
3 सांगली 76 0
4 सांगली मिरज कुपवाड मनपा 11 1
5 सिंधुदुर्ग 19 0
6 रत्नागिरी 171 5
कोल्हापूर मंडळ एकूण 617 7
1 औरंगाबाद 26 1
2 औरंगाबाद मनपा 1284 52
3 जालना 73 0
4 हिंगोली 133 0
5 परभणी 19 1
6 परभणी मनपा 6 0
औरंगाबाद मंडळ एकूण 1541 54
1 लातूर 74 3
2 लातूर मनपा 8 0
3 उस्मानाबाद 37 0
5 बीड 32 0
6 नांदेड 19 0
7 नांदेड मनपा 86 5
लातूर मंडळ एकूण 256 8
1 अकोला 39 2
2 अकोला मनपा 398 15
3 अमरावती 16 2
4 अमवरावती मनपा 177 12
5 यवतमाळ 115 0
6 बुलढाणा 49 3
7 वाशीम 8 0
अकोला मंडळ एकूण 802 34
1 नागपूर 9 0
2 नागपूर मनपा 472 8
3 वर्धा 7 1
4 भंडारा 14 0
5 गोंदिया 47 0
6 चंद्रपूर 16 0
7 चंद्रपूर मनपा 9 0
8 गडचिरोली 26 0
नागपूर मंडळ एकूण 600 9
1 इतर राज्य 52 12
एकूण 54758 1792

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात 24 मार्च पासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यानंतर लॉकडाऊनचा कालावधी तीन टप्प्यात वाढवण्यात आला. सध्या देशासह राज्यात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु असून तोही येत्या 3-4 दिवसांत संपणार आहे. त्यानंतर काय होणार, हा प्रश्न जनतेचा मनात आहे. दरम्यान आज महाविकास आघाडीच्या मंत्र्यांची वर्षा बंगल्यावर बैठक पार पडणार असून त्यात लॉकडाऊनपुढील आराखडा तयार करण्यात येण्याची शक्यता आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now