Coronavirus In Maharashtra: तुम्ही राहत असणाऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण? पहा महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी

यासहित अन्य जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत याची सविस्तर आकडेवारी जाणून घ्या..

Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Coronavirus Update: महाराष्ट्रात काल (16 मे 2020) च्या दिवसभरात 1606 नवीन कोरोना व्हायरस (Coronavirus In Maharashtra) रुग्ण आणि 67 नवीन मृतांची नोंद झाली, ज्यानुसार राज्यातील संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 30,706 झाली आहे तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1135 झाली आहे. सध्या 22,479 सक्रीय रुग्ण असून, आज राज्यात 524 लोक बरे झाले असून, आतापर्यंत 7088 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार एकट्या मुंबईत (Mumbai) काल 884 नवीन कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते ज्यानुसार मुंबईतील रुग्णांची संख्या 18, 396 वर गेली आहे. तसेच, पुणे (Pune) शहरात सुद्धा कालच्या एका दिवसात 202 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते, पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा सध्या 3 हजार 295 इतका आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका हा महाराष्ट्राला बसला आहे, त्यातही मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक हे कोरोनाचे केंद्रबिंदू ठरले आहेत. यासहित अन्य जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत याची सविस्तर आकडेवारी जाणून घ्या.. महाराष्ट्र हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे, त्यामुळे केंद्राने राज्याला पूर्ण पाठिंबा द्यावा - राहुल गांधी

कोरोनाच्या प्रसारानुसार महाराष्ट्रात रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोन मध्ये जिल्ह्यांचे विभाजन करण्यात आले आहे. तुम्ही राहत असणारा जिल्हा नेमक्या कोणत्या झोन मध्ये येतो हे जाणुन घेण्यासाठी इथे क्लिक करा.

COVID-19 पॉझिटीव्ह रुग्णांची जिल्हा/मनपा निहाय यादी:

अ.क्र. जिल्हा/मनपा बाधित रुग्ण मृत्यू
1 मुंबई मनपा 18,555 696
2 ठाणे 205 3
3 ठाणे मनपा 1416 18
4 नवी मुंबई मनपा 1812 14
5 कल्याण डोंबिवली मनपा 502 6
6 उल्हासनगर मनपा 100 0
7 भिवंडी निजामपूर मनपा 50 2
8 मीरा भाईंदर 340 4
9 पालघर 42 2
10 वसई विरार मनपा 340 11
11 रायगड 218 2
12 पनवेल मनपा 196 10
ठाणे मंडळ एकूण 23, 209  768
1 नाशिक 102 0
2 नाशिक मनपा 66 1
3 मालेगाव मनपा 667 34
4 अहमदनगर 56 3
5 अहमदनगर मनपा 16 0
6 धुळे 10 3
7 धुळे मनपा 67 5
8 जळगाव 193 26
9 जळगाव मनपा 57 4
10 नंदुरबार 22 2
नाशिक मंडळ एकूण 1256 78
1 पुणे 189 5
2 पुणे मनपा 3302 179
3 पिंपरी-चिंचवड मनपा 156 4
4 सोलापूर 9 1
5 सोलापूर मनपा 362 21
6 सातारा 131 2
पुणे मंडळ एकूण 4149 212
1 कोल्हापूर 21 1
2 कोल्हापूर मनपा 6 0
3 सांगली 38 0
4 सांगली मिरज कुपवाड मनपा 7 1
5 सिंधुदुर्ग 7 0
6 रत्नागिरी 91 3
कोल्हापूर मंडळ एकूण 173 5
1 औरंगाबाद 97 0
2 औरंगाबाद मनपा 776 25
3 जालना 21 0
4 हिंगोली 66 0
5 परभणी 5 1
6 परभणी मनपा 1 0
औरंगाबाद मंडळ एकूण 966 26
1 लातूर 33 1
2 लातूर मनपा 0 0
3 उस्मानाबाद 7 0
5 बीड 1 0
6 नांदेड 5 0
7 नांदेड मनपा 54 4
लातूर मंडळ एकूण 101 5
1 अकोला 19 1
2 अकोला मनपा 217 13
3 अमरावती 6 2
4 अमवरावती मनपा 96 11
5 यवतमाळ 99 0
6 बुलढाणा 26 1
7 वाशीम 3 0
अकोला मंडळ एकूण 466 28
1 नागपूर 2 0
2 नागपूर मनपा 350 2
3 वर्धा 2 1
4 भंडारा 1 0
5 गोंदिया 1 0
6 चंद्रपूर 1 0
7 चंद्रपूर मनपा 4 0
8 गडचिरोली 0 0
नागपूर मंडळ एकूण 361 3
1 इतर राज्य 41 10
एकूण 30, 706  1135

दरम्यान, चाचण्यांबाबत राज्याचे आरग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजपर्यंत २ लाख 61 हजार 783 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत 2 लाख 31 हजार 71 जणांचे नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 30 हजार 706 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 3  लाख 34 हजार 558 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 17 हजार 48 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif