Coronavirus: महाराष्ट्रासह आज मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची सर्वाधिक वाढ, नागरिकांनो नियमांचे पालन करा
तर गेल्या 24 तासात राज्यात आणखी 25,833 रुग्ण आढळले असून गेल्या वेळी 24 हजारांच्या पार नव्या रुग्णांचा आकडा गेला होता. त्याचसोबत 58 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.
Coronavirus: महाराष्ट्रात गुरुवारी कोरोनाच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर गेल्या 24 तासात राज्यात आणखी 25,833 रुग्ण आढळले असून गेल्या वेळी 24 हजारांच्या पार नव्या रुग्णांचा आकडा गेला होता. त्याचसोबत 58 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.(Coronavirus in Nagpur: नागपूर मध्ये कोरोनाचा कहर सुरुच; आज 3,796 नव्या रुग्णांची भर)
राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा एकूण आकडा 53,138 वर आतापर्यंत पोहचला आहे. त्याचसोबत 23,96,340 जणांना कोरोनाची लागण झाली असून 21.75 जणांनी त्यावर मात केली आहे. या व्यतिरिक्त गेल्या 24 तासात 12,764 नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. महाराष्ट्रात सध्या 1,66,353 कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दुसऱ्या बाजूला नागपूर मध्ये दुसऱ्या दिवशी सु्द्धा सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण 2,926 झाले असून मुंबईत 2877 आणि पुण्यात 2791 रुग्ण आढळले आहेत.
Tweet:
महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत सुद्धा गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांचा आकडा तुफान वाढत चालला आहे. शहरात गेल्या 24 सात कोरोनाचे नव्याने 2877 रुग्ण आढळल्याने आकडा 3,52.853 वर पोहचला आहे. तर 8 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.आतापर्यंत एकूण 11,55 कोरोनामुळे मुंबईत मृत्यू झाला असून 18,000 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.(मुंबई: Breach Candy Hospital नजिक रेस्टॉरंटमध्ये 245 विनामास्क नागरिकांवर BMC ची कारवाई; Gaumdevi Police Station मध्ये तक्रार दाखल)
Tweet:
दरम्यान, डिसेंबर नंतर आज सर्वाधिक कोरोनाच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रात एकूण रुग्णसंख्येच्या 61,21 टक्के रुग्णांचा आकडा असून त्यानंतर केरळ आणि पंजाबचा क्रमांक लागतो. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 35,871 रुग्ण आढळले आहे. याआधी 6 डिसेंबरचा एकाच दिवसात कोरोनाच्या 36,011 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. आरोग्य मंत्रालयानुसार महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि तमिळनाडू येथे सातत्याने कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.