Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्र हादरले! राज्यात गेल्या 3 दिवसांत 421 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात मोठी वाढ होताना दिसत आहे. यामुळे कोरोनाबाबत राज्यातील नागरिकांच्या मनात घबराट निर्माण झाली आहे.

Death | Representational Image | (Photo Credits: Twitter)

भारतात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात मोठी वाढ होताना दिसत आहे. यामुळे कोरोनाबाबत राज्यातील नागरिकांच्या मनात घबराट निर्माण झाली आहे. यातच महाराष्ट्रातील नागरिकांच्या चिंतेत भर टाकणारी आणखी एक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 97 हजार 648 पोहचला आहे. तर, कोरोनामुळे आतापर्यंत 3 हजार 590 जणांनी आपला जीव गमवला आहे. मात्र, राज्यात गेल्या 3 दिवसांत 421 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. यात मुंबईतील रुग्णांचा अधिक समावेश आहे. 9 जानेवारी रोजी मृतांची झालेली नोंद

महाराष्ट्रात मंगळवारी 149 आणि बुधवारी 120 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, आज यात आणखी 152 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. ज्यामुळे राज्यात गेल्या 3 दिवसात एकूण 421 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि सफाई कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. यामुळे संपूर्ण देशातून त्यांचे कौतूक केले जात आहे. 10 जानेवारी रोजी मृतांची झालेली नोंद

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकार सतत जनजागृती करूनही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. प्रशासनाकडून कडक कायदे करूनही लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. देशात संचारबंदी असूनही अनेक ठिकाणी लोक खरेदी किंवा इतर कारणांमुळे घराबाहेर पडत आहेत. यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवरही कारवाई केली जात आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif