Coronavirus Hotspots in Maharashtra: महाराष्ट्रात जिल्हानिहाय जाणून घ्या 'हॉटस्पॉट्स'ची यादी; जिल्हा Red Zone, Green Zone कसा ठरतो?

ज्या जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाबाधित तो रेड झोन असून तेथे संचारबंदीचे नियम कडक करण्यात आले आहेत. सध्या महाराष्ट्रात 14 कोरोना व्हायरस हॉटस्पॉट्स आहेत.

प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

भारतामध्ये कोरोनाग्रस्तांचा वाढत असला तरीही अद्याप देश कोरोना फैलावाच्या तिसर्‍या टप्प्यामध्ये नसल्याची माहिती वारंवार आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात येत आहे. कोरोनाचा समुह संसर्ग रोखण्यासाठी आता प्रशासनाकडून कडक पावलं उचलत कोरोनाव्हायरस हॉटस्पॉट्स ओळखून त्यावरलक्ष केंद्रीत करण्याचा कामाला आता वेग आला आहे. देशामध्ये सध्या 170 जिल्हे आणि 25 राज्यांमध्ये हे कोरोना हॉटस्पॉट्स बनवण्यात आले आहेत. ज्या जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाबाधित तो रेड झोन असून तेथे संचारबंदीचे नियम कडक करण्यात आले आहेत. सध्या महाराष्ट्रात 14 कोरोना व्हायरस हॉटस्पॉट्स आहेत. Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्र राज्यात आज 165 नव्या रुग्णांची नोंद; राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 3000 च्या पार.  

आज आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 165 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 3081 वर पोहचला आहे. आज मुंबईमध्ये 107 नवे रुग्ण आढळले असून अहमदनगर-1, चंद्रपूर-1, मालेगाव-4, नागपूर- 1, नागपूर मनपा- 10, नवी मुंबई मनपा-2, पनवेल मनपा- 1, ठाणे- 3, ठाणे मनपा- 9, ठाणे जिल्हा- 1, वसई विरार मनपा-2, पिंपरी-चिंचवड- 4, पुणे- 19 असे नवीन रुग्ण सापडले आहेत.

बहुसंख्य कोरोनाबाधितांचा हॉट्स्पॉट

मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, सांगली, अहमदनगर, यवतमाळ, औरंगाबाद, बुलढाणा, मुंबई उपनगर, नाशिक

कोरोना बधितांचा क्लस्टर भाग

अमरावती, पालघर,

हॉट्स्पॉट नाहीत मात्र कोरोनाबाधित आढळत असलेले भाग

अकोला. सातारा, रत्नागिरी, लातूर, उस्मानाबाद, जळगाव, बीड, सिंधुदुर्ग, रायगड, बीड, हिंगोली, वाशिम, गोंदिया, जालना, धुळे, सोलापूर

दरम्यान भारतामध्ये 24 मार्चपासून लॉकडाऊन आहे. तो आता 3 मेपर्यंत वाढवण्यात देखील आला आहे. मात्र ज्याभागात कोरोनाचं प्रमाण नियंत्रणात असेल अशा ठिकाणी 20 एप्रिलपासून संचारबंदीचे नियम शिथील करून काही प्रमाणात नाग्गरिकांना फिरायला मुभा मिळू शकते.

हॉट्स्पॉट्स कसे ठरतात?

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारताच्या एकूण कोरोनाबाधितांच्या तुलनेत ज्या जिल्ह्यांत सर्वाधिक कोरोना बाधित आढळणं, राज्याच्या एकूण कोरोनाबाधितांच्या तुलनेत 80% हून अधिक कोरोनाबाधित आढळणं, 4 दिवसांच्या आत जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा दुप्पटीने वाढणं या निकषाच्या आधारे हॉटस्पॉट्स निवडले जातात. जर 14 दिवसांत हॉटस्पॉटमध्ये नवा रूग्ण आढळला नाही तर तो जिल्हा नॉन हॉटस्पॉटमध्ये समाविष्ट केला जातो. जर सलग 28 दिवसांमध्ये नवा रूग्ण आढळला नाही तर तो ग्रीन झोन होतो.