Coronavirus: सोलापूर येथील राष्ट्रवादी पक्षाच्या माजी आमदाराचा कोरोनामुळे मृत्यू
राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. सर्वसामान्यांपासून ते बॉलिवूड कलाकार आणि राजकीय नेत्यांपर्यंत अनेकजण कोरोनाच्या जाळ्यात अडकल्याचे समजत आहे.
कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) धुमाकूळ घातला आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. सर्वसामान्यांपासून ते बॉलिवूड कलाकार आणि राजकीय नेत्यांपर्यंत अनेकजण कोरोनाच्या जाळ्यात अडकल्याचे समजत आहे. यातच सोलापूर (Solapur) येथील राष्ट्रवादी पक्षाचे माजी आमदार युनूस शेख (Yunnus Sheikh) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यूनूस शेख हे 80 वर्षाचे होते. शनिवारी त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल आला होता. ज्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांचा कोरोना विरोधातील लढा अपयशी ठरला आणि त्यांचा मृत्यू झाला. सोलापूरमधील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. या घटनेने सोलापूरसह राज्यात खळबळ उडाली आहे.
युनूस भाई शेख गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यरत होते. एवढेच नव्हेतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू म्हणून ओळखले जात असे. शनिवारी त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यात त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झालं. यानंतर तात्काळ त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने राष्ट्रवादी पक्षातील कार्यकर्त्यांना चांगलाच धक्का बसला आहे. हे देखील वाचा- महाविकास आघाडी काही खटके उडत असल्याने मुख्यमंत्र्यांशी लवकरच करणार याबाबत चर्चा- अशोक चव्हाण
ट्वीट-
युनूस शेख कोण होते?
युनूस शेख हे 19969, 1974 आणि 1995 अशा 3 वेळा सोलापूर महापालिका निवडणुकीत विजय झाले होते. त्यांनी 1974 ते 1975 या काळात महापौरपदाची जबाबदारी सांभाळली होती. शहरातील शरद पवार यांच्या राजकारणाची सूत्रे एकेकाळी त्यांनीच हाताळली होती. विशेषतः महापालिकेचा कारभार त्यांच्याच हाती एकवटला होता. त्यानंतर 1992 साली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून त्यांना विधान परिषदेवर बिनविरोध निवडून पाठविण्यात आले होते. मात्र, 1997 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.
महाराष्ट्रात मुंबई, पुणे या दोन शहरानंतर सोलापूर जिल्ह्यातदेखील कोरोनाचे जाळे अधिक वेगाने पसरत चालले आहे. सोलापूरमध्ये (13 जूनपर्यंत) 1 हजार 659 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी 143 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 836 जणांनी कोरोनावर मात केली आहे.