Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्र सरकारला आर्थिक मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड-19 या अकाउंटवर द्या योगदान; उद्धव ठाकरे यांचे आवाहन (Check Bank Account Details)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड-19 (CM Relief Fund COVID 19) हे बँक खाते उघडण्यात आले आहे, यापुढे कोरोनाशी संबंधित सर्व आर्थिक मदत ही याच अकाउंटवर स्वीकारली जाणार आहे.

CM Uddhav Thackeray | (Photo Credit : ANI/ Twitter)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संकटाविरुद्ध सुरु असणाऱ्या लढाईत महाराष्ट्र सरकारला (Maharashtra Government) आर्थिक मदत करताना अनेकांनी मुख्यमंत्री सहायता निधीत (CM Relief Fund)  मागील काही दिवसांत योगदान दिले आहे. या संकटाचा सर्वात जास्त फटका हा महाराष्ट्राला बसला आहे त्यामुळे यातून बाहेर येण्यासाठी साहजिकच आर्थिक मदत आवश्यक असणार आहे. ही आर्थिक मदत देण्याची एकच असल्यास यापुढे नागरिकांना एका वेगळ्या आणि स्वतंत्र अकाउंटवर योगदान देता येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड-19 (CM Relief Fund COVID 19) हे बँक खाते उघडण्यात आले आहे, यापुढे कोरोनाशी संबंधित सर्व आर्थिक मदत ही याच अकाउंटवर स्वीकारली जाणार आहे. याबाबत सविस्तर डिटेल्स जाणून घ्या..

Maharashtra Chief Minister’s Relief Fund-COVID 19 Bank Details

-बँक बचत खाते क्रमांक- 39239591720

स्टेट बँक ऑफ इंडिया,

मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई (400023)

-शाखा कोड (Branch Code) : 00300

-आयएफएससी कोड (IFSC CODE): SBIN0000300

Coronavirus विरुद्ध लढाईत आर्थिक मदत करण्यासाठी PM Cares Fund मध्ये द्या योगदान; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जनतेला आवाहन (Check Bank Account Details)

प्राप्त माहितीनुसार, या आपत्कालीन स्थितीत नागरिकांनी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांने केले आहे. सदर देणगीदारांना आयकर अधिनियम 1961 च्या 80(G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येणार आहे. या देणगीसाठी अगदी कमीतकमी रक्कम देखील स्वीकारली जाईल, मात्र रक्कम दान करताना संबंधित व्यक्तींनी बँक डिटेल्सबाबत दक्षता बाळगावी असे देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now