Coronavirus: कोरोना व्हायरस विरुद्धचा लढा यशस्वी जिंकल्यावर महाराष्ट्र पोलीस कर्मचाऱ्याने सांगितला अनुभव (Video)

त्याची कहाणी हे सिद्ध करते की वेळेत उपचार मिळाल्याने यावर सहज मात केली जाऊ शकते. कोणीही घाबरण्याचं कारण नाही''.

Maharashtra Police personnel | (PC - Twitter)

महाराष्ट्र पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दलातील एक कर्मचारी आपला अनुभव शेअर करताना दिसत आहे. ज्याची कोरोना व्हायरस (Coronavirus) चाचणी पॉझिटीव्ह आली होती आणि त्याने कोरोना व्हायरस संकटावर यशस्वी मात केली. शिवाय ठणठणीत बरा झाल्यावर तो पुन्हा एकदा आपल्या कर्तव्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचे अनुभव ट्विटरच्या माध्यमातून पुढे आणत महाराष्ट्र पोलिसांनी म्हटले आहे की, ''वेळेत उपचार मिळाल्याने कोरोनावर सहज मात केली जाऊ शकते. कोणीही घाबरण्याचं कारण नाही.''

महाराष्ट्र पोलिसांनी ट्विटरवर शेअर केलेल्या या व्हिडिओत हा पोलीस सांगतो की, दिनांक 1 मे 2020 रोजी माझा कोरोना व्हायरस पॉझिटीव्ह आल्याने मला सिव्हील हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. सिव्हिल हॉस्पीटलमधून 1 मे 2020 औरंगाबाद येथील हॉस्टिपटलमध्ये दाखल करण्यात आले. दिनांक 1 ते 11 मे पर्यंत औरंगाबाद येथील हॉस्पिटलमध्ये उपचार घेतला. या दरम्यान आम्हाला औषधं, जेवण याबाबतची माहिती सीओ साहेब स्वत: विचारत होते. क्वारंटाईन सेंटरला भेट देत होते. सॅनिटायजर्स, हॅण्डग्लोज आणि इतर सर्व गोष्टींची काळजी घेतली जात होती. 11 मे 2020 रोजी कोरोना व्हायरस चाचणी निगेटीव्ह घेऊन मी परत आलो. परत आल्यावर माझे स्वागत करण्यात आले. (हेही वाचा, Coronavirus: 'काही टेंशन घेऊ नको रे, मित्रा!' Corona Warrior परत आलायं; COVID-19 संक्रमित मुंबई पोलीस कर्मचारी कोरोनामुक्त)

महाराष्ट्र पोलीस ट्विट

दरम्यान, महाराष्ट्र पोलिसांनी आपल्या ट्विटर पोस्टमध्ये म्हटले आहे की, ''कर्तव्य पार पाडत असताना कोरोनाबाधित झालेला हा योद्धा कोरोनावर विजय मिळवून परतला आहे आणि पुन्हा ड्युटी करण्यास तत्पर आहे. त्याची कहाणी हे सिद्ध करते की वेळेत उपचार मिळाल्याने यावर सहज मात केली जाऊ शकते. कोणीही घाबरण्याचं कारण नाही''.