Coronavirus: पालघर येथे आजपासून अत्यावश्यक, जीवनावश्यक वस्तूंच्या वाहनांशिवाय अन्य गाड्यांना पेट्रोल-डिझेल देण्यास मनाई

त्याचसोबत अत्यावश्यक सेवासुविधांसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घराबाहेर पडण्यास परवानगी आहे. याच पार्श्वभुमीवर पालघर येथे आजपासून अत्यावश्यक, जीवनावश्यक वस्तूंच्या वाहनांशिवाय अन्य गाड्यांना पेट्रोल-डिझेल देण्यास मनाई करण्यात आली आहे.

Representational Image | (Photo Credits: PTI)

चीन मधील वुहान शहरातून लागण झालेल्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. चीनमध्ये सध्या परिस्थिती पूर्ववत झाली असली तरीही अन्य देशांना त्याचा जबरदस्त फटका बसला आहे. खासकरुन अमेरिका आणि इटली येथे कोरोना व्हायरसमुळे 10 हजारांपेक्षा अधिक जळांचा बळी गेला आहे. तर भारतात सुद्धा कोरोना व्हायरसने थैमान घातले असून सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे राज्य सरकारने लॉकडाउनचे आदेश देत नागरिकांना घरीच थांबण्याचे आवाहन केले आहे. त्याचसोबत अत्यावश्यक सेवासुविधांसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घराबाहेर पडण्यास परवानगी आहे. याच पार्श्वभुमीवर पालघर येथे आजपासून अत्यावश्यक, जीवनावश्यक वस्तूंच्या वाहनांशिवाय अन्य गाड्यांना पेट्रोल-डिझेल देण्यास मनाई करण्यात आली आहे.

मुंबईसह अन्य राज्यात अत्यावश्यक सेवासुविधा फक्त सुरु ठेवण्यात आल्या आहेत. या काळात फक्त अत्यावश्यक सेवासुविधांची वाहतूक करणारी वाहने रस्त्यांवर धावू शकणार आहेत. त्यामुळे या वाहनांना पेट्रोल पंपवर इंधन देणे अनिवार्य आहे. मात्र नागरिकांना त्यांच्या स्वत:च्या वाहनांमध्ये पेट्रोल-डिझेल टाकण्यास मनाई केल्याचे आदेश पालघर येथे आज सकाळी 11 वाजल्यापासून लागू केले आहेत. तसेच रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांच्या विरोधात पोलिसांकडून सुद्धा कठोर कारवाई केली जात आहे.(Coronavirus: लॉक डाऊनच्या काळात पुणेकरांनी तोडले सर्वाधिक नियम; राज्यातील एकूण 27,432 गुन्ह्यांपैकी पुण्यात 3,255 गुन्ह्यांची नोंद)

दरम्यान, देशभरात कोरोना व्हायरसचे 5 हजाराच्यावर रुग्णांची संख्या आहे. तर आता पर्यंत 166 जणांचा मृत्यू आणि 473 जणांची प्रकृती सुधारली आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा सर्वाधिक असून दिवसेंदिवस नवे रुग्ण समोर येत आहेत. त्यानुसार कोरोनाबाधितांचा आकडा 1297 वर पोहचला आहे. सरकारने आता राज्यात फिव्हर क्लिनिक्स आणि कोरोनाबाधितांसाटी विशेष हॉस्पिटल्स अशी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif