Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात आढळला कोरोना विषाणूचा E484Q आणि L452R वेरिएन्ट
एकूण 14 जिल्ह्यांमध्ये 2032 नमुने घेण्यात आले. त्यापैकी 11 जिल्ह्यांमध्ये 123 नमुन्यांमध्ये नवा व्हेरिएन्ट आढळला आहे
भारतात पुन्हा एकदा कोरोना विषाणूची (Coronavirus) लाट येताना दिसत आहे. यात महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या बरीच मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसते आहे. त्यात आणखी महत्त्वाचे असे की, राज्यात कोरोना विषाणूचे दोन नवे व्हेरीएन्ट (Covid 19 Variants) पुढे आले आहेत. महाराष्ट्रात कोरोना विषाणुचे E484Q आणि L452R असे दोन व्हेरीएन्ट आढळले आहेत. प्राप्त माहितीनुसार कोरोनाच्या नव्या 15% ते 20% नमुन्यांमध्ये कोरोनाचे हे नवे व्हेरिएन्ट आडलले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रासोबतच केरळ राज्यातही कोरोना व्हायरस संक्रमितांमध्ये N440K नावाचा नवा व्हेरिएन्ट आढळला आहे. एकूण 14 जिल्ह्यांमध्ये 2032 नमुने घेण्यात आले. त्यापैकी 11 जिल्ह्यांमध्ये 123 नमुन्यांमध्ये नवा व्हेरिएन्ट आढळला आहे.
आंध्रप्रदेश राज्यात 33% नमुन्यांमध्ये N440K वेरिएन्ट आढळला होता. केरळमध्ये सापडलेला नवा व्हेरीएन्ट N440K तेलंगनामध्ये सापडला. एकूण 53 नमुन्यांमध्ये हा व्हेरिएन्ट आढळला. N440K हा व्हेरिएन्ट जगभरातील इतरही काही देशांमध्ये आढळला आहे. (हेही वाचा, महाराष्ट्रातून गुजरात मध्ये जाणाऱ्या नागरिकांना सोबत COVID19 चे निगेटिव्ह रिपोर्ट्स आणणे अनिवार्य)
महाराष्ट्रातील नमुन्यांचे केलेल्या विश्लेषणात आढळून आले की, डिसेंबर 2020 च्या तुलनेत E484Q आणि L452R म्यूटेशनसह काही प्रमाणात वाढ झाली आहे. हे नवे व्हेरिएन्ट मानवी शरीरातील प्रतिकारक शक्ती कमी करते आणि आपले संक्रमण वाढवते. हे म्यूटेशन सुमारे 15-20% नमुन्यांमध्ये आढळून आले आहे. तसेच, या आधी अशा प्रकारचा व्हेरिएन्ट कधीही आढळून आला नाही.
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सकाळी आठ वाजता जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात सलग 14 व्या दिवशी कोविड संक्रमितांच्या आकडेवारीत वाढ झाली आहे. देशात सध्यास्थितीतीतही 3,68,457 कोरोना संक्रमित आहेत. जे एकूण प्रकरणांच्या 3.14% आहेत. उपचार घेऊन बरे होणाऱ्या रुग्णांचा दरही 95.49% इतका आहे.