महाराष्ट्रातील Coronavirus संक्रमित रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी, आजचे ताजे अपडेट एका क्लिकवर

त्यापाठोपाठ पुण्यात 1128 कोरोना बाधितांची एकूण संख्या झाली आहे.

Coronavirus Outbreak | Representational Image | (Photo Credits: IANS)

कोरोना व्हायरस (Coronavirus) विषाणूने संपूर्ण देशभरात हैदोस घातला असून सद्य स्थितीत कोरोना बाधितांची एकूण संख्या 27,892 वर पोहोचली असून 872 रुग्ण दगावले आहेत. तर 6185 बरे झाले असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. सध्या भारतात 20, 835 रुग्णांवर उपचार सुरु आहेत अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. भारतात गेल्या 24 तासांत 1396 नवे रुग्ण आढळले असून 48 रुग्ण दगावले आहेत. तर महाराष्ट्रातही काही कोरोना बाधितांची संख्या वाढत असून सद्य स्थिती महाराष्ट्रात कोरोनाचे एकूण 8068 रुग्ण आढळले आहेत. तर 342 रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

तर मुंबईत कोरोना बाधितांची एकूण संख्या 6343 वर पोहोचली असून 223 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापाठोपाठ पुण्यात 1128 कोरोना बाधितांची एकूण संख्या झाली आहे. मुंबई: कोरोनामुक्त 4 रूग्णांमध्ये आढळल्या अ‍ॅन्टी बॉडीज; अत्यावस्थ रुग्णांना Plasma Therapy देण्यासाठी होणार मदत, BMC चे COVID Survivors ना प्लाझ्मा डोनेशचं आवाहन

पाहा राज्यातील जिल्हानिहाय COVID-19 संक्रमित रुग्णांची आकडेवारी

कोविड-19 महाराष्ट्र राज्याची जिल्हा/मनपा निहाय सध्या स्थिती

(*अद्ययावत आकडेवारी दि. 26 एप्रिल 2020, सायं 6.00 नुसार)

अ.क्र. जिल्हा/मनपा बाधित रुग्ण मृत्यू
1 मुंबई मनपा 5407 204
2 ठाणे 738 14
3 पालघर 141 4
4 रायगड 57 1
मुंबई मंडळ एकूण 6343 223
5 नाशिक 131 12
6 अहमदनगर 36 2
7 धुळे 25 3
8 जळगाव 19 4
9 नंदुरबार 11 1
नाशिक मंडळ एकूण 222 22
10 पुणे 1052 76
11 सोलापूर 47 5
12 सातारा 29 2
पुणे मंडळ एकूण 1128 83
13 कोल्हापूर 10 0
14 सांगली 27 1
15 सिंधूदुर्ग 1 0
16 रत्नागिरी 8 1
कोल्हापूर मंडळ एकूण 46 2
17 औरंगाबाद 50 5
18 जालना 2 0
19 हिंगोली 8 0
20 परभणी 1 0
औरंगाबाद मंडळ एकूण 61 5
21 लातूर 9 63
22 उस्मानाबाद 3 0
23 बीड 1 1
24 नांदेड 1 0
लातूर मंडळ एकूण 14 0
25 अकोला 29 1
26 अमरावती 20 1
27 यवतमाळ 48 0
28 बुलढाणा 21 1
29 वाशिम 1 0
अकोला मंडळ एकूण 119 3
30 नागपुर 107 1
31 वर्धा 0 0
32 भंडारा 0 0
33 गोंदिया 1 0
34 चंद्रपुर 2 0
35 गडचिरोली 0 0
नागपुर मंडळ एकूण 110 1
इतर राज्य 25 2
 एकूण 8068 342

जगभरात कोरोना बाधितांची संख्या 29 लाखांच्या वर पोहोचली असून अमेरिकेत अक्षरश: या विषाणूने थैमान घातले आहेत. गेल्या 24 तासांत अमेरिकेत 1,330 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत एकूण 9 लाखांच्या वर लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif