Coronavirus: महाराष्ट्रातील COVID-19 संक्रमित रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी; आजचे ताजे अपडेट एका क्लिकवर

तर, 49 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतातील एकूण कोरोनाव्हायरस पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 26,496 वर पोचली आहे. यात 19868 रुग्ण उपचा घेत आहेत. 5804 बरे झाले आहेत. तर 824 जणांचा मृत्यू झाला आहे.

Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

राज्यातील कोरोना व्हायरस (Coronavirus) रुग्णांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय आहे. पण, असे असतानाच मुंबई, पुणे वगळता राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये कोरना व्हायरस रुग्णांची घटती संख्या हे सद्यास्थितीत दिलासादायक वृत्तही आहे. महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या ही देशभरातील इतर राज्यांच्या तुलनेत अधिक आहे. ही अधिकची संख्या सरसकट नाही. राज्यातील काही जिल्ह्यांमधीलच आहे. जाणून घ्या महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस रुग्णांची जिल्हानिहाय संख्या. दरम्यान, या संख्येसोबतच कोणत्या जिल्ह्यात कोरोणा रुग्णांच्या मृत्यूची संख्या किती हेही पाहा.

महाराष्ट्रातील जिल्हानिहाय कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची इथे दिलेली आकडेवारी ही 24 एप्रिल 2020 या दिवशी सायंकाळी 6 वाजता अद्ययावत करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्रालय प्रत्येक दिवसाची कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी आणि तपशील हा त्या त्या दिवशी सायंकाळी 6 किंवा त्याच दिवशी रात्री उशीरा अद्यावत करत असते. त्यानुसार प्राप्त झालेली अधिकृत आकडेवारी खालील तक्त्यात दिली आहे. (हेही वाचा, पुण्यातील खासगी रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि हॉटेल ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु करावी; पालकमंत्री अजित पवार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश)

कोविड-19 महाराष्ट्र राज्याची जिल्हा/मनपा निहाय सध्या स्थिती

(*अद्ययावत आकडेवारी दि. 23 एप्रिल 2020, सायं 6.00 नुसार)

अ.क्र. जिल्हा/मनपा बाधित रुग्ण मृत्यू
1 मुंबई मनपा 5049 111
2 ठाणे 717 15
3 पालघर 139 4
4 रायगड 56 1
मुंबई मंडळ एकूण 5961 211
5 नाशिक 131 12
6 अहमदनगर 35 2
7 धुळे 25 3
8 जळगाव 13 2
9 नंदुरबार 11 1
नाशिक मंडळ एकूण 215 20
10 पुणे 1030 73
11 सोलापूर 46 4
12 सातारा 29 2
पुणे मंडळ एकूण 1105 79
13 कोल्हापूर 10 0
14 सांगली 26 1
15 सिंधूदुर्ग 1 0
16 रत्नागिरी 8 1
कोल्हापूर मंडळ एकूण 45 2
17 औरंगाबाद 50 5
18 जालना 2 0
19 हिंगोली 8 0
20 परभणी 1 0
औरंगाबाद मंडळ एकूण 61 5
21 लातूर 9 63
22 उस्मानाबाद 3 0
23 बीड 1 0
24 नांदेड 1 0
लातूर मंडळ एकूण 14 0
25 अकोला 23 1
26 अमरावती 19 1
27 यवतमाळ 28 0
28 बुलढाणा 21 1
29 वाशिम 1 0
अकोला मंडळ एकूण 92 3
30 नागपुर 107 1
31 वर्धा 0 0
32 भंडारा 0 0
33 गोंदिया 1 0
34 चंद्रपुर 2 0
35 गडचिरोली 0 0
नागपुर मंडळ एकूण 110 1
 एकूण 7628 323

दरम्यान, देशात गेल्या 24 तासात 1990 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 49 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतातील एकूण कोरोनाव्हायरस पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 26,496 वर पोचली आहे. यात 19868 रुग्ण उपचा घेत आहेत. 5804 बरे झाले आहेत. तर 824 जणांचा मृत्यू झाला आहे.