Coronavirus: महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी; आजचे ताजे अपडेट एका क्लिकवर

त्यातील 840 जणांना उपचारानंतर बरे वाटू लागल्याने रुग्णालयातून सुट्टी (डिस्चार्ज) देण्यात आला आहे. तर गेल्या 24 तासात 14 जणांचा मृत्यू झाला आहे.

Coronavirus In Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाचा समाना करण्यासाठी देशभर लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आला आहे. महाराष्ट्रातही तो आहे. विशेष म्हणजे हा लॉकडाऊन काटेकोरपणे पाळण्याचा प्रयत्न होत असतानाही कोरोना व्हायरस संक्रमित रुग्ण वाढत आहेत. ही चिंतेची बाबत. प्रामुख्याने मुंबई (Mumbai) आणि पुणे (Pune) जिल्ह्यात हे रुग्ण सर्वाधिक आहेत. त्यानंतर मग राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या येते. यात महत्त्वाचे असे की, महाराष्ट्रात कोरोना व्हायरस रुग्णांची (Maharashtra Coronavirus Patient) संख्या देशभराती राज्यांच्या तुलनेत अधिक आहे. महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवरी आपणास माहिती आहे काय? जाणून घ्या महाराष्ट्रतील कोरोना रुग्ण आणि मृतांची अधिकृत आकडेवारी.

शेवटची अद्ययावत माहिती हाती आली त्यानुसार महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या 6427 इतकी आहे. त्यातील 840 जणांना उपचारानंतर बरे वाटू लागल्याने रुग्णालयातून सुट्टी (डिस्चार्ज) देण्यात आला आहे. तर गेल्या 24 तासात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. (हेही वाचा, Coronavirus Outbreak: कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा वाढला; देशात 23,077 रुग्ण, 718 जणांचा मृत्यू)

जिल्हानिहाय आकडेवारी

कोविड-19 महाराष्ट्र राज्याची जिल्हा/मनपा निहाय सध्या स्थिती

(*अद्ययावत आकडेवारी दि. 23 एप्रिल 2020, सायं 6.00 नुसार)

अ.क्र. जिल्हा/मनपा बाधित रुग्ण मृत्यू
1 मुंबई मनपा 4205 167
2 ठाणे 34 2
3 ठाणे मनपा 214 4
4 नवी मुंबई मनपा 97 4
5 कल्याण डोंबिवली मनपा 124 3
6 उल्हासनगर मनपा 2 0
7 भिवंडी निजामपूर मनपा 8 0
8 मीरा भाईंदर 116 2
9 पालघर 21 1
10 वसई विरार मनपा 109 3
11 रायगड 14 0
12 पनवेल मनपा 36 1
  ठाणे मंडळ एकूण 4980 187
1 नाशिक 4 0
2 नाशिक मनपा 7 0
3 मालेगाव मनपा 109 9
4 अहमदनगर 18 2
5 अहमदनगर मनपा 14 0
6 धुळे 4 1
7 धुळे मनपा 13 1
8 जळगाव 6 1
9 जळगाव मनपा 2 1
10 नंदुरबार 7 1
  नाशिक मंडळ एकूण 184 16
1 पुणे 41 1
2 पुणे मनपा 812 59
3 पिंप्री-चिंचवड मनपा 57 2
4 सोलापूर 1 0
5 सोलापूर मनपा 32 3
6 सातारा 20 2
  पुणे मंडळ एकुण 963 67
1 कोल्हापूर 6 0
2 कोल्हापूर मनपा 3 0
3 सांगली 25 0
4 सांगली मिरज कुपवाड मनपा 1 1
5 सिंधुदुर्ग 1 0
6 रत्नागिरी 7 1
  कोल्हापूर मंडळ एकुण 43 2
1 औरंगाबाद 0 0
2 औरंगाबाद मनपा 40 5
3 जालना 3 0
4 हिंगोली 7 0
5 परभणी 0 0
6 परभणी मनपा 1 0
  औरंगाबाद मंडळ एकूण 51 5
1 लातूर 8 0
2 लातूर मनपा 0 0
3 उस्मानाबाद 3 0
5 बीड 1 0
6 नांदेड 0 0
7 नांदेड मनपा 1 0
  लातूर मंडळ एकूण 13 0
1 अकोला 11 1
2 अकोला मनपा 9 0
3 अमरावती 0 0
4 अमवरावती मनपा 7 1
5 यवतमाळ 17 0
6 बुलढाणा 24 1
7 वाशीम 1 0
  अकोला मंडळ एकूण 69 3
1 नागपूर 2 0
2 नागपूर मनपा 98 1
3 वर्धा 0 0
4 भंडारा 0 0
5 गोंदिया 1 0
6 चंद्रपूर 0 0
7 चंद्रपूर मनपा 2 0
8 गडचिरोली 0 0
  नागपूर मंडळ एकूण 103 1
  एकूण 6427 283

महाराष्ट्रातील जिल्हानिहाय कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची इथे दिलेली आकडेवारी ही 23 एप्रिल 2020 या दिवशी सायंकाळी 6 वाजता अद्ययावत करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्रालय प्रत्येक दिवसाची कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी आणि तपशील हा त्या त्या दिवशी सायंकाळी 6 किंवा त्याच दिवशी रात्री उशीरा अद्यावत करत असते. त्यानुसार प्राप्त झालेली अधिकृत आकडेवारी खालील तक्त्यात दिली आहे.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात देशभरात 1684 नवे कोरोना व्हायरस संक्रमित रुग्ण आढळले आहेत. तर 37 जणांचा मृत्यू झाला आहे. देशभरात आतापर्यंत 23,00 पेक्षाही अधिक (23,077) कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील प्रत्यक्ष रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 17610 इतकी आहे. 4749 जणांना उपचारानंतर बरे वाटूल लागल्याने रुग्णालयातून सुट्टी (डिस्चार्ज) देण्यात आला आहे. तर 718 कोरोना रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.