IPL Auction 2025 Live

महाराष्ट्रातील जिल्ह्यानुसार COVID-19 संक्रमितांची एकूण आकडेवारी, जाणून घ्या आजचे ताजे अपडेट्स एका क्लिकवर

देशात महाराष्ट्र जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण आहेत.

Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

देशभरात वाढती जाणारी कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी 3 मे ला संपत असलेला लॉकडाऊन 17 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार कोरोना संक्रमितांची (Coronavirus) एकूण संख्या 35,365 पर्यंत जाऊन पोहोचली आहे. यात उपचारानंतर प्रकृती सुधारल्याने आणि बरे वाटल्याने रुग्णालयातून सुट्टी (डिस्चार्ज) देण्यात आलेल्या 9064 जणांचाही समावेश आहे. तसेच देशभरातील कोरना संक्रमित एकूण 1152 मृतांचाही या आकडेवारीत समावेश आहे. तर महाराष्ट्रात कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांचा आकडा 11,506 वर पोहोचला आहे. तर दुसरीकडे 485 रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे.

कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी सर्व शासकीय, वैद्यकिय यंत्रणा आपापल्या परीने प्रयत्न करत आहे. देशात महाराष्ट्र जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण आहेत. Mumbai Corona Update Today: मुंबईकरांनो सावधान! आज 751 नव्या रुग्णांची नोंद; एकूण 7 हजार 625 लोकांना कोरोनाची लागण

जाणून घेऊया महाराष्ट्रातील जिल्हानिहाय कोरोना संक्रमितांची आकडेवारी:

कोविड-१९ महाराष्ट्र राज्याची जिल्हा/मनपा निहाय सध्या स्थिती 

शेवटचे अद्यावत दि. 01 मे 2020, सायं 6.00

अ.क्र. जिल्हा/मनपा बाधित रुग्ण मृत्यू
1 मुंबई मनपा 7061 295
2 ठाणे 51 2
3 ठाणे मनपा 438 7
4 नवी मुंबई मनपा 193 3
5 कल्याण डोंबिवली मनपा 179 3
6 उल्हासनगर मनपा 3 0
7 भिवंडी निजामपूर मनपा 17 1
8 मीरा भाईंदर 135 2
9 पालघर 44 1
10 वसई विरार मनपा 135 3
11 रायगड 26 1
12 पनवेल मनपा 48 2
ठाणे मंडळ एकूण 9081 320
1 नाशिक 6 0
2 नाशिक मनपा 35 0
3 मालेगाव मनपा 201 12
4 अहमदनगर 26 2
5 अहमदनगर मनपा 16 0
6 धुळे 8 2
7 धुळे मनपा 18 1
8 जळगाव 34 11
9 जळगाव मनपा 10 1
10 नंदुरबार 11 1
नाशिक मंडळ एकूण 365 30
1 पुणे 68 4
2 पुणे मनपा 1176 92
3 पिंप्री-चिंचवड मनपा 72 3
4 सोलापूर 7 0
5 सोलापूर मनपा 101 6
6 सातारा 32 2
पुणे मंडळ एकुण 1456 107
1 कोल्हापूर 9 0
2 कोल्हापूर मनपा 6 0
3 सांगली 29 0
4 सांगली मिरज कुपवाड मनपा 1 1
5 सिंधुदुर्ग 2 0
6 रत्नागिरी 8 1
कोल्हापूर मंडळ एकुण 55 3
1 औरंगाबाद 2 0
2 औरंगाबाद मनपा 159 8
3 जालना 3 0
4 हिंगोली 22 0
5 परभणी 1 1
6 परभणी मनपा 2 0
औरंगाबाद मंडळ एकूण 189 9
1 लातूर 12 1
2 लातूर मनपा 0 0
3 उस्मानाबाद 3 0
4 बीड 1 0
5 नांदेड 0 0
6 नांदेड मनपा 4 1
लातूर मंडळ एकूण 20 2
1 अकोला 12 1
2 अकोला मनपा 27 0
3 अमरावती 2 0
4 अमवरावती मनपा 26 7
5 यवतमाळ 79 0
6 बुलढाणा 21 1
7 वाशीम 1 1
अकोला मंडळ एकूण 169 9
1 नागपूर 6 0
2 नागपूर मनपा 133 2
3 वर्धा 0 0
4 भंडारा 1 0
5 गोंदिया 1 0
6 चंद्रपूर 0 0
7 चंद्रपूर मनपा 3 0
8 गडचिरोली 0 0
नागपूर मंडळ एकूण 144 2
1 इतर राज्य 27 3
एकूण 11506 485

मुंबईत (Mumbai) काल कोरोनामुळे 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, एकूण 751 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे कोरोना बाधीतांची संख्या 7 हजार 625 वर पोहचली आहे. यापैकी 1567 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर एकूण 295 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरुवातीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात जमावबंदी कायदा लागू केला होता. त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात 21 दिवसांकरिता संचारबंदी घोषीत केली होती. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन 17 मेपर्यंत संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. कोरोना विषाणूने संपूर्ण देशात थैमान घातला आहे.