Curfew in Akola: अकोला जिल्ह्यात संचारबंदीचा बडगा, रविवारी संपूर्ण दिवस इतर वेळी नागरिकांसाठी रात्रीचा संचार बंद

परिसरातील उद्योग, आदी गोष्टींना संचारबंदीतून सवलत देण्यात आली आहे.

Coronavirus | Representational Image (Photo Credits: Pixabay)

अकोला जिल्ह्यात (Akola District) पुन्हा एकदा कोरोना व्हायरस संसर्गाचा धोका वाढताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासन सावध पावले टाकताना दिसत आहे. प्रशासाने संचारबंदी (Curfew ) जाहीर केली असून ही संचारबंधी (Curfew in Akola) पुढील आदेश येईपर्यंत कायम राहणार आहे. संचारबंदी आदेशानुसार प्रत्येक रविवारी पूर्णपणे संचारबंदी तर रविवारशिवाय इतर दिवशी रात्रीच्या वेळी संचारबंदी असणार आहे. रात्रीच्या वेळी संचारबंदीदरम्यान प्रवास करताना वाहनातील प्रवासी संख्या, गर्दी होणाऱ्या ठिकाणी सोशल डिस्टंन्सींगचे पालन करावे लागणार आहे.

प्राप्त माहितीनुसार, शासन आदेशानुसार यापुढील काळात प्रत्येक रविवारी पूर्ण दिवस संचारबंदी लागू असणार आहे. तर शनिवार ते सोमवार रात्री 8 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संपूर्ण अकोला जिल्ह्यात संचारबंदी लागू असेल. या कालावथी कोणतीही व्यक्ती मुक्तसंचार करु शकणार नाही. जर एखाद्या व्यक्तीने कोरोना नियमांचे उल्लंघन केले तर संबंधित व्यक्तीवर कारवाई केली जाऊ शकते.

दरम्यान, औषध दुकाने, अॅम्‍बुलन्‍स सेवा, दूध आणि दूग्धजन्य पदार्थ विकणाऱ्या डेअरी, डेअरी दुकाने, भाजपाला विक्री करणारी दुकाने, रेल्वे-बस अथवा खासगी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ऑटोरिक्षा, एम.आय.डी.सी. परिसरातील उद्योग, आदी गोष्टींना संचारबंदीतून सवलत देण्यात आली आहे. (हेही वाचा, Bacchu Kadu, Nana Patole: बच्चू कडू यांना दुसऱ्यांदा कोरोना संसर्ग; घरातील दोघे COVID 19 पॉझिटीव्ह आल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले क्वारंटाईन)

दुसऱ्या बाजूला, आठवडी बाजार बंद असणार आहेत. याशिवाय लग्नसमारंभासाठी केवळ 50 व्यक्तीच उपस्थित राहू शकतात. लग्न अथवा समारंभ अशा ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यन्वित करणे बंधनकारक असणार आहे. याशिवाय चारचाकी वाहनांमधून प्रवास असेल तर 1 चालक आणि सोबत 3 व्यक्ती, वाहन जर ऑटोरिक्षा असेल तर 1 चालक आणि 2 प्रवासी इतकीच संख्या असणे आवश्यक आहे. सर्व प्रकारची आस्‍थापना, दुकाने, बाजारपेठ, बार, हॉटेल, सिनेमागृह, मनोरंजन उद्याने इत्‍यादी सकाळी 6 ते रात्री 8 या कालावधीत सुरू राहतील.