Coronavirus: सीएसएमटी येथे कर्तव्य बजावणाऱ्या रेल्वे पोलीस कॉन्स्टेबलला कोरोनाची लागण

याच पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या 14 एप्रिल पर्यंत लॉकडाउनचे आदेश देण्यात आले आहे. तर महाराष्ट्रात सुद्धा कोरोनाबाधितांचा आकडा 300 च्या पार गेला आहे.

Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

देशभरात थैमान घालत असलेल्या कोरोना व्हायरसच्या (Coronavirus)  रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याच पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी येत्या 14 एप्रिल पर्यंत लॉकडाउनचे आदेश देण्यात आले आहे. तर महाराष्ट्रात सुद्धा कोरोनाबाधितांचा आकडा 300 च्या पार गेला आहे. या लॉकडाउनच्या काळात डॉक्टरांसह अन्य अत्यावश्यक सेवासुविधा पुरवणारे कर्मचारी दिवसरात्र काम करत आहेत. मात्र नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करुन सुद्धा काही ना काही कारणामुळे बाहेर पडत आहेत. त्यामुळे पोलिसांना आता अशा नागरिकांवर कारवाई करण्याची वेळ आली आहे. याच पार्श्वभुमीवर मुंबईतील सीएसएमटी स्थानकातील एका रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आपले कर्तव्य बजावणाऱ्या एका रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे या पोलीसाच्या संपर्कात आलेल्या आता पर्यंत 8 जणांना क्वारंटाइनचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच पत्नी आणि दोन मुले हे सर्वजण कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत.(मुंबई: जसलोक हॉस्पिटल मध्ये नर्स आणि रूग्ण कोरोना बाधित असल्याचा रिपोर्ट आल्याने OPD Services, नव्या रूग्णांची भरती तात्पुरती स्थगित)

दरम्यान, कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी मुंबई महानगर पालिकेने शहरातील आणि उपनगरातील एकूण 146 परिसर सील केले आहेत. ज्या ठिकाणी करोनाचे रूग्ण सापडले आहेत किंवा ज्या ठिकाणी करोनाग्रस्तांच्या संपर्कात येऊन करोनाची लागण झाली आहे, अशी ठिकाणे पालिकेच्यावतीने सील करण्यात आली आहे. हे परिसर सील करताना इथल्या लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरुच राहिल याची खबरदारी आम्ही घेतली असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.