Coronavirus: केवळ कोरोना व्हायरस नव्हे, या आधीही भारतात आल्या अनेक साथी, ज्याने घेतले लक्षवधी नागरिकांचे प्राण

पण, असे होण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही कॉलरा (Cholera) प्लेग (Plague), इन्फ्ल्युएन्झा (Influenza), पोलिओ ( Polio), देवी (Smallpox) अशा अनेक साथी आल्या आहेत. ज्यामुळे हजारो लोकांचे प्राण गेले आहेत. इथे आम्ही अशाच काही साथिंबाबत सांगत आहोत. ज्यामुळे लक्षवधी लोकांचे गेले होते जीव.

Pandemic | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस संकटाने केवळ एकाद-दुसरा देश नव्हे. अवघे जग हादरुन गेले आहे. भारतातही या आजाराने आतापर्यंत जवळपास 400 चा टप्पा ओलांडला आहे. एकट्या महाराष्ट्रातच कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या 89 इतकी झाली आहे. संशयीतांचा आकडा आजून वेगळा आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरसला COVID-19 असे नाव दिले आहे. COVID-19 हा एक साथीचा आजार असल्याचेही जागगतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. कोरोना व्हायरस या महासाथीने जग घायकुतीला आले आहे. पण, असे होण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही कॉलरा (Cholera) प्लेग (Plague), इन्फ्ल्युएन्झा (Influenza), पोलिओ ( Polio), देवी (Smallpox) अशा अनेक साथी आल्या आहेत. ज्यामुळे हजारो लोकांचे प्राण गेले आहेत. इथे आम्ही अशाच काही साथिंबाबत सांगत आहोत. ज्यामुळे लक्षवधी लोकांचे गेले होते जीव.

कॉलरा

1817

भारत तेव्हा ब्रिटीशांच्या अंमलाखाली होता. भारताच पहिल्यांदाच कॉलराची साथ आली. 23 ऑगस्ट 1817 या दिवशी कॉलराचा एक रुग्ण पहिल्यांदा भारतात सापडला. सुरुवातील अगदी मोजक्याच ठिकाणी असलेली साथ हाहा म्हणता म्हणाता इतकी पसरली की, अनेक नागरिक मृत्युमूखी पडले. दरम्यान, या साथीत मृत्यू पावलेल्यांची संख्या नोंदवण्यात आली नव्हती. त्यामुळे या साथीत तेव्हा किती लोक मृत्यू झाले याचा आकडा उपलब्ध नाही.

1852

पुणे पुन्हा एकदा बरोबर 12 वर्षांनी भारतात कॉलराची साथ फिरुन आली. या वेळी साथीचा कालावधी 1852 ते 1860 असा जवळपास 8 वर्षे होता. या काळातही अनेक नागरिकांचे प्राण गेले. विशेष म्हणजे ही साथ तेव्हा विदेशातही पोहोचली तेव्हाच्या रशियात असलेल्या पर्शिया, अरेबिया आदी ठिकाणीही या साथीने अनेकांचे प्राण घेतले.

1863

या वर्षीही कॉलराची साथ आली. मात्र, या वेळी नागरिकांचे जास्त प्राण गेले ते यात्रा आणि जत्रांमुळे. विविध कारणांसाठी लोक एकत्र आल्याने नागरिकांना कॉलरा बाधा झाली आणि नागरिकांचे प्राण गेले. पुढे 1877 आणि 1881 मध्येही कॉलराची साथ आली आणि नागरिकांचे प्राण गेले.

प्लेग

प्लेगची साथ आली तेव्हाही भारतावर ब्रिटिशांचाच अंमल होता. या अंमतालत मुंबई शहरात प्लेगची साथ आली. इतकी भयानक की हजारो नागरिकांचे प्राण गेले. ते वर्ष होते 1896. या काळात राजकारण, समाजकारण या साथीने ढवळून निघाले. अनेकांनी शहरं सोडली. पुण्यातही या महाभयानक साथीने अनेकांचे प्राण घेतले. पुढे देशभरात ही साथ पसरली. लोक मरत गेले. (हेही वाचा, चीन: Coronavirus संक्रमित महिलेने दिला सुदृढ बाळाला जन्म)

इन्फ्ल्युएन्झा

इन्फ्ल्युएन्झा साथीने तेव्हा जगभरात हाहाकार माजवला. तो काळ होता 1918 ते 1919. इन्फ्ल्युएन्झाला तेव्हा स्पॅनिश फ्लू असेही म्हटले जायचे. हा आजार 'H1N1' (एच 1 एन 1) विषाणूमुळे झाल्याचे नंतर पुढे आले. या आजारात तेव्हा 2 ते 5 कोटी इतक्या नागरिकांचा बळी गेल्याचे सांगितले जाते.

पोलीओ

भारतात साधारण 1970 ते 1990 हा काळ पोलीओच्या साथीचा म्हणून ओळखला जातो. या काळात शहर आणि देशाचा ग्रामीण भागात पोलीओ रुग्णांचे प्रमाण मोठे होते. या वेळी अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले.

देवी

भारतातील अनेक राज्यांमध्ये 1994 च्या सुमारास देवीच्या रोगाने तांडव केले. अनेक नागरिकांना तेव्हाही प्राणास मुकावे लागले. हा आझार इतका भायावह होता की, भारतातील सुमारे 85 टक्के नागरिकांना तेवा या आजाराची बाधा झाल्याचे सांगितले जाते. पश्‍चिम बंगाल, बिहार, ओरिसा या राज्यांमध्ये तेव्हा या आजाराचा कह पाहायला मिळाला होता. या आजाराने तेव्हा 15 नागरिकांचे बळी घेतल्याचा आकडा आहे.

दरम्यान, अलिकडी काळातही अनेक साथी आल्याचे आपल्याला पाहायला मिळते. जसे की, 2000 मध्ये भारतात प्लेगची साथ आली होती. ही साथ प्रामुख्याने उत्तर भारत आणि हिमाचल प्रदेशात आली होत. पण, ही साथ फार पसरली नाही. लवकरच आटोक्यात आली. 2003 मध्ये भारतात डेंगी या आजाराची साथ आली. ही साथ पसरु नये म्हणून जोरदार प्रयत्न करण्यात आले. ती आटोक्यातही आली. पण, तरीही या साथीचे गांभीर्य मठे होते. दरम्यान, साथीचे रोग हे अनेकदा येतच असतात. त्यावर उपाययोजनाही होते. काहीच साथी अशा असतात. ज्या अधिक जीवित हानी करतात.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif