Coronavirus: जाणून घ्या महाराष्ट्रासह मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकची कोरोना विषाणू रुग्णांची आजची आकडेवारी

राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि सिनेमागृहांमध्ये केवळ क्षमतेच्या 50 टक्केच लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे. तर राज्यात कोणत्याही राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम घेण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Coronavirus प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: PTI)

राज्यात वाढत असलेल्या कोरोना विषाणू (Coronavirus) रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सरकारने पुन्हा काही कडक निर्बंध लादले आहेत. राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि सिनेमागृहांमध्ये केवळ क्षमतेच्या 50 टक्केच लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे. तर राज्यात कोणत्याही राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. आज महाराष्ट्रामध्ये कालच्यापेक्षा कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात आज 15,051 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 10,671 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 21,44,743 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,30,547 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.07% झाले आहे.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये आज 1712 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, एकूण रुग्ण संख्या 345659 वर पोहोचली आहे. आज शहरात 1063 रुग्ण बरे झाले असून, 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 11535 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईमध्ये 14582 सक्रीय रुग्ण आहेत. पुणे शहरात आज नव्याने 1,082 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, पुणे शहरातील एकूण संख्या आता 2,19,285 इतकी झाली आहे. शहरातील 678 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असू,न पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 2,02,339 झाली आहे. सध्या शहरात 11,984 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. (हेही वाचा: Gauahar Khan: कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अभिनेत्री गौहर खान विरोधात गुन्हा दाखल)

नागपूर जिल्ह्यात आज 2297 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात आज 1308 रुग्णांची नोंद झाली असून, सध्या जिल्ह्यात 8867 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान, आज जाहीर केल्या निर्बंधांचे पालन न झाल्यास संबंधितांवर फौजदारी करण्यात येणार आहे. तसेच मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग न पाळल्यास थेट दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही या आदेशात म्हटले आहे.