भिवंडीत भाजी खरेदी करण्यावेळी सोशल डिस्टंन्सिंगचा बोजवारा, गर्दीमुळे तीन बत्ती मार्केट बंद

तरीही नागरिकांना त्याचा अर्थ कळत नसून भिवंडीत भाजी खरेदी करण्यावेळी सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचा बोजवारा झाल्याचे दिसून आले. भाजी खरेदी करताना नागरिकांची आणि विक्रेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आल्याने आता तीन बत्ती मार्केट बंद करण्यात आले आहे.

प्रतिकात्मक फोटो (Phoro Credits-Twitter)

महाराष्ट्रासह देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून आकडा आता 6 हजारांच्या पार गेला आहे. त्यामुळे नागरिकांनी सद्यची परिस्थिती गांभीर्याने घेऊन लॉकडाउनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे अत्यावश्यक आहे. मात्र काही ठिकाणी नागरिकांकडून या नियमाचे उल्लंघन करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांकडून काही जणांवर कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांना गरज असल्यासच घराबाहेर पडा असे आवाहन वारंवार केले जात आहेत. तरीही नागरिकांना त्याचा अर्थ कळत नसून भिवंडीत भाजी खरेदी करण्यावेळी सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचा बोजवारा झाल्याचे दिसून आले. भाजी खरेदी करताना नागरिकांची आणि विक्रेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आल्याने आता तीन बत्ती मार्केट बंद करण्यात आले आहे.

भिवंडीत दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. सध्या भिवंडीत 15 वर पोहचली आहे. त्याचसोबत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग राहतो. मात्र कोरोनाची परिस्थिती पाहता सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. परंतु भाजी खरेदी करतेवेळी त्याचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. ऐवढेच नाही तर भाजी मार्केटमध्ये भाजी खरेदी करण्यासाठी चुकून एखाद्याला कोरोनाची लागण झाल्यास त्याचे काय परिणाम होईल याचा सुद्धा विचार करणे महत्वाचे आहे. त्यामुळे धारावी सारखी भिवंडीची अवस्था होऊ नये म्हणून प्रशासनाने या ठिकाणी लक्ष घालावे असे म्हटले जात आहे.(Coronavirus: महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी; आजचे ताजे अपडेट एका क्लिकवर)

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 6427 वर पोहचला आहे. तर 283 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. त्यामुळे आता तरी नागरिकांना जागृक होऊन कोरोनाची साखळी तोडायची असल्यास नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. तर देशात कोरोनाचे रुग्ण 12 हजारांपेक्षा अधिक आहेत. येत्या 3 मे पर्यंत लॉकडाउन कायम राहणार आहे. परंतु 3 मे नंतर लॉकडाउनच्या नियमासंदर्भात काय निर्णय घेतला जाणार याकडे आता सर्व जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.



संबंधित बातम्या