Coronavirus: जबाबदार नागरिक व्हा, इडियट नाही - महाराष्ट्र पोलीस
बाहेर जाताना मास्क लावला व अंतर राखलं तर आपण लवकरच "आल इज वेल" म्हणू शकू''.
जबाबदार नागरिक व्हा, इडियट नाही! असे आम्ही नव्हे महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) म्हणत आहेत. कोरोना व्हायरस (Coronavirus) संकचाचा सामना करताना मुंबई पोलिसांनी हटके संदेश देत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. अनेकांना असे वाटते की नियम आणि कायद्याचे पालन करताना पोलीस हे नेहमीच खाकी आणि दंडुक्याचा वापर करतात. परंतू, तसे नाही पोलीस जनहिताचा संदेश देतेताना आणि जनजागृती करताना विविध पर्याय आणि संकल्पनांचाही आधार घेतात. या वेळीही पोलिसांनी संदेश देण्यासाठी बहुचर्चित थ्री इडियट्स (3 Idiots) या बॉलिवूड चित्रपटाचा आधार घेतला आहे.
कोरोना व्हायरस संदर्भात ट्विटरच्या माध्यमातून संदेश देण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी आपल्या पोस्टमध्ये एक खास इमेज वापरली आहे. जी थ्री इडियट्स चित्रपटाच्या पोस्टर्ससाठीही वापरली होती. त्याचा आधार घेत पोलिसांनी संदेश दिला आहे. (हेही वाचा, कोविड-19 मुळे मुंबई पोलिस दलातील 4 पोलिसांनी एकाच दिवशी गमावले प्राण; ट्विटच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली)
ट्विट
महाराष्ट्र पोलिसांचाच्या ट्विटर पोस्टमध्ये म्हटले आहे की, '' जबाबदार नागरिक व्हा, इडियट नाही! वायरसला धडा शिकवायचा असेल तर नियमांशी "चतुराई" करू नका. बाहेर जाताना मास्क लावला व अंतर राखलं तर आपण लवकरच "आल इज वेल" म्हणू शकू''.
दरम्यान, संपूर्ण भारताचा विचार करता महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची आकडेवारी सर्वाधिक आहे. त्यातही मुंबई आणि पुण्यातील कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या अधिक आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील अनेक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनाही कोरोना व्हायरस संक्रमन झाले आहे. तर काही कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. कोरनाशी यशस्वी लढा देऊन कर्तव्यावर पुन्हा हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्याही चांगली आहे.