राज्यात बनावट सॅनिटायझर विकणाऱ्यांच्या विरोधात कारवाईला सुरुवात- राजेंद्र शिंगणे
तर काही देशांनी त्यांच्या हवाई सीमा बंद केल्या असून परदेशात काही भारतीय नागरिक अडकले आहेत. तर महाराष्ट्रात सुद्धा कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 42 वर पोहचली आहे.
चीन मधील वुहान शहारातून लागण झालेल्या कोरोनाचे जाळे जगभरात पसरले आहेत. तर काही देशांनी त्यांच्या हवाई सीमा बंद केल्या असून परदेशात काही भारतीय नागरिक अडकले आहेत. तर महाराष्ट्रात सुद्धा कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 42 वर पोहचली आहे. त्यामुळे सरकारकडून नागरिकांना वारंवार स्वत:ची काळजी घेण्यासाठी आवाहन केले जात आहे. तसेच नागरिकांनी तोंडाला मास्क लावणे, हात वारंवार धुणे असे ही सांगण्यात आले आहे. मात्र हात धुण्यासाठी साबण नसल्यास नागरिक सॅनिटायझरचा वापर करत आहेत. त्यामुळे बाजारात सॅनिटायझरचा तुटवडा निर्माण झाला आहे. याच संधीचा फायदा घेत काहीजण बनावट सॅनिटायझरची विक्री बाजारात करत असल्याची प्रकरणे समोर आली आहेत.
आरोग्य आणि पुरवठा मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी पत्रकार परिषद आज बोलावली होती. त्यावेळी त्यांनी राज्यातील कोरोना व्हायरसबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच बाजारात सॅनिटायझरची वाढती मागणी पाहता त्याचा तुटवडा निर्माण झाला असून तो पुढील दोन दिवसात भरुन काढण्यात येईल असे स्पष्ट केले आहे. दुसऱ्या बाजूला बाजारात अन्य राज्यातून सॅनिटायझर मागवले जात आहे. त्याचसोबत काहीजण बनावट सॅनिटायझर नागरिकांना विकत असल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत. गेल्या 8 दिवसात बनावट सॅनिटाझर विक्री करणाऱ्या 22 ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे.(Corona In Maharashtra: पुणे शहरात कोरोना व्हायरसची आणखी एकाला लागण)
तर पुण्यात अजून एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या 42 वर पोहतली आहे. सदर महिलेने फ्रान्स आणि नेदरलॅन्ड्स येथून प्रवास करुन भारतात दाखल झाली होती. याबाबत पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी अधिकृत माहिती दिली आहे. तसेच भारतात कोरोना व्हायरसची लागण झाल्याचा आकडा 140 च्या पार गेला आहे. यापैकी दिल्ली, कर्नाटक आणि महाराष्ट्र येथे कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.