New Guideline for International Passengers: ​विदेशी प्रवाशांसाठी 7 दिवस क्वारंटाईन बंधनकारक; Omicron नियंत्रणासाठी केंद्र सरकारकडून नव्या गाईडलाईन्स

केंद्र सरकारने भारतात येणाऱ्या विदेशी प्रवाशांवर नियमांचे निर्बंध घालत सात दिवस क्वारंटाईन (Quarantine) अनिवार्य केले आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: Getty)

देशभरातील वाढत्या कोरोना व्हायरस (Coronavirus) आणि ओमायक्रोन (Omicron) संक्रमित रुग्णांच्या वाढीवर नियंत्रण घालण्यासाठी केंद्र सरकार कार्यरत झाले आहे. केंद्र सरकारने भारतात येणाऱ्या विदेशी प्रवाशांवर नियमांचे निर्बंध घालत सात दिवस क्वारंटाईन (Quarantine) अनिवार्य केले आहे. सुरुवातीला पहिल्या सात दिवसांच्या क्वारंटाईन नियमांमध्ये केवळ 'एट रिस्क' ( At Risk) वाल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी नियम होता. मात्र, आता 'नॉन एट रिस्क' ( Non At Risk)देशंतील प्रवाशांनाही हे नियम लागू असतील. आठव्या दिवशी RT PCR करणेही अनिवार्य असणार आहे. दोन्ही श्रेणीतील प्रवाशांना RT PCR चा अहवाल 'एअर सुविधा'वर अपलोड करायचा आहे. केंद्र सरकारने दिलेली मार्गदर्शक नियमावली (New Guideline for International Passengers) येत्या 11 जानेवारीपासून लागू होईल.

दरम्यान, ओमायक्रोन संक्रमीत रुग्णांचे देशभरातील प्रमाण तीन हजारांच्याही पार पोहोचले आहे. देशातील कोरोना व्हायरस संक्रमितांची सख्याही प्रतिदिन 1 लाख 17 हजार पेक्षा अधिक येऊ लागली आहे. प्रतिदिन मृतांची संख्याही शुक्रवारी (7 जानेवारी) 300 च्या पार पोहोचला. अशा स्थितीत कोरोना नियंत्रणासाठी केंद्रीय पातळीवरही मोठ्या हालचाली सुरु आहेत. कोरोनाची ताजी प्रकरणे वाढू लागल्याने At risk श्रेणीतील देशांची सख्या वाढून ती आता 19 झाली आहे. नऊ आणखी देश या श्रेणीत समाविष्ट झाले आहेत. 1डिसेंबर 2021 रोजी विदेशातून भारतात आलेल्या नागरिकांसाठी गाईडलाईन्समध्ये बदल करण्यात आले होते. नव्या गाईडलाईन्स नव्या at risk countries सोबत 11 जानेवारीपासून लागू होतील.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 1 डिसेंबरपासून प्रभावी गाईडलाईन्सच्या माध्यमातून 11 देशांच्या at risk मध्ये समाविष्ट करण्यात आला होता. यात युकेसह युरोपचे देश दक्षिण अफ्रीका, ब्राजील, बोत्‍सवाना, चीन, मॉरीशस, न्‍यूजीलैंड, जिम्‍बाब्‍वे, सिंगापुर, हाँगकाृँग आणि इज्रायल आदींचा समावेश होता. आता नव्या गाईडलाईन्सनुसार घाना, तंजानिया, कांगो, इथियोपिया, कजाकिस्‍तान, केन्‍या, नाइजीरिया, ट्यूनीशिया आणि जाम्बिया आदी देशांचाही समावेश आहे.