Coronavirus: कोरोना व्हायरसमुळे जीव गमावलेल्या महिलेच्या संपर्कात आल्यानंतर पळ काढणाऱ्या 4 महिलांना पोलिसांनी घेतले ताब्यात
त्यानंतर या महिलांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे.
कोरोना व्हायरसने देशभरासह महाराष्ट्रात थैमान घातले आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाचा प्रारदुर्भाव अधिक वाढू नये म्हणून विनाकारण रस्त्यावर फिरणे किंवा गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे अशा सुचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत. तसेच लॉकडाउनमुळे स्थलांतरिक करणाऱ्या कामगार वर्गाला सुद्धा राज्यात थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहेत. त्याचसोबत ज्या नागरिकांना कोरोनाची लक्षणे दिसून येत आहेत त्यांनी लपून न बसता त्यासंबंधित चाचणी करावी अशा सुचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभुमीवर कोरोना व्हायरसमुळे जीव गमावलेल्या महिलेच्या संपर्कात अन्य 4 महिला आल्या होत्या. त्यानंतर या महिलांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला. या मृत महिलेच्या संपर्कात 4 महिला आल्या होता. त्यांना डॉक्टरांकडे जाऊन चाचणी करण्याचा सल्ला दिला होता. मात्र या महिला मुंबईबाहेर पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना टोकावडे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. तसेच 4 महिलांना आता वैद्यकिय तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.मात्र या महिलांना कोरोनाची चाचणी करण्याचा सल्ला दिला होता. परंतु या महिलांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांना मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.(Coronaviru In Maharashtra: covidyoddha@gmail.com इमेल आयडीवर तांत्रिक समस्येचे निराकरण; इच्छुक डॉक्टरांसह, प्रशिक्षित मेडिकल कर्मचाऱ्यांना पुन्हा माहिती पाठवण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ट्विटच्या माध्यमातून आवाहन)
दरम्यान, देशभरात कोरोना व्हायरसचे 5 हजाराच्यावर रुग्णांची संख्या आहे. तर आता पर्यंत 166 जणांचा मृत्यू आणि 473 जणांची प्रकृती सुधारली आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा सर्वाधिक असून दिवसेंदिवस नवे रुग्ण समोर येत आहेत. त्यानुसार कोरोनाबाधितांचा आकडा 1297 वर पोहचला आहे. सरकारने आता राज्यात फिव्हर क्लिनिक्स आणि कोरोनाबाधितांसाटी विशेष हॉस्पिटल्स अशी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते.