Coronavirus: पुणे येथे आणखी कोरोना व्हायरसचे 37 रुग्ण आढळल्याने आकडा 141 वर पोहचला

त्यानंतर आता अन्य राज्यात सुद्धा कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. आता पुण्यात आणखी 37 रुग्ण आढळून आल्याने आकडा 141 वर पोहचला आहे.

Coronavirus Representational Image (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून रुग्णांच्या आकडेवरीत दिवसागणिक भर पडली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजन केल्या जात आहेत. तर महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 700 च्या पार गेल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच कोरोनाबाधित रुग्णांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात प्रथम कोरोना व्हायरसचा रुग्ण पुण्यात आढळून आला होता. त्यानंतर आता अन्य राज्यात सुद्धा कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. आता पुण्यात आणखी 37 रुग्ण आढळून आल्याने आकडा 141 वर पोहचला आहे.

तसेच दिल्लीतील मरकजच्या कार्यक्रमला पुण्यातील तबलीगी समाजातील नागरिकांनी उपस्थिती लावली होती. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. तर कार्यक्रमाला उपस्थिती लावलेल्या नागरिकांनी स्वत:हून पुढे येऊन कोरोनाची चाचणी करावी असे आवाहन महापौर मुरलीधर मोहळ यांनी केले आहे. आता पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 141 वर पोहचला आहे. त्याचसोबत दाट वस्तीत राहणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी असे ही नागरिकांना सुचना देण्यात आली आहे.(Coronavirus: राज्यातील 4 लाखांहून अधिक स्थलांतरित कामगारांसाठी सरकारकडून 4653 रिलिफ कॅम्प शेल्टर्सची सोय- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे)

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये क्वारंटाइनचा शिक्का हातावर असून ही नागरिक बाहेर फिरत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. दुसऱ्या बाजूला कोरोनाची लक्षणे असलेले काही जण त्याबाबत लपवणूक करत असल्याचे ही दिसून आले आहे. त्यामुळे नादगरिकांनी घाबरुन न जाता लक्षणे दिसून आल्यास आरोग्य यंत्रणांशी संपर्क साधावा असे आवाहन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.