महाराष्ट्र: नाशिक येथे आणखी 7 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने आकडा 149 वर
त्यामुळे नाशिक (Nashik) येथील कोरोनाबाधितांचा आकडा 149 वर पोहचला आहे.
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत चालली असून ती चिंतेची बाब आहे. त्यामुळे नागरिकांना वारंवार गर्दी करु नका जेणेकरुन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होईल असे आवाहन करण्यात येत आहे. तरीही नागरिक सकाळच्या वेळेस काही ना काही कारण सांगत घराबाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे. त्याचसोबत सकाळच्या वेळेस भाजी खरेदी करताना नागरिकांची त्यासाठी मोठी गर्दी आणि सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचा फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. याच दरम्यान आता नाशिक येथे कोरोनाचे नवे 7 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नाशिक (Nashik) येथील कोरोनाबाधितांचा आकडा 149 वर पोहचला आहे.
नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा शंभरीच्या पार गेला आहे. यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांसह ट्रेनी डॉक्टरांनासुद्धा त्याची लागण झाली आहे. डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचारी कोरोबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी पीपीई किट्स आणि मास्क यांचा वापर करुन उपचार करतात. मात्र तरीसुद्धा डॉक्टरांना कोरोनाची लागण होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाबाधित रुग्णांनी सुद्धा आपल्या आरोग्याची पूर्णपणे काळजी घेणे अत्यावश्यक आहे. तसेच होम क्वारंटाइनचा सल्ला दिला असल्यास त्याचे सुद्धा पालन करावे अशा सुचना देण्यात आल्या आहेत.(Coronavirus: मुंबईतील Containment Zones च्या यादीतून 231 झोन्स झाले मुक्त- किशोरी पेडणेकर)
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 8 हजारांच्या पार गेला आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाची सद्यची परिस्थिती गांभीर्याने घ्यावी असे आवाहन केले जात आहे. तसेच डॉक्टर्स आणि पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांचे कर्तव्य बजावत असताना सहकार्य करावे असे ही सांगण्यात आले आहे. राज्याची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार आता 3 मे नंतर ग्रीन झोन मधील क्षेत्रांना दिलासा मिळू शकतो अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. परंतु मुख्यमंत्री 3 मे नंतर राज्याची परिस्थिती पाहून लॉकडाउनच्या नियमासंदर्भात निर्णय जाहीर करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.