Lockdown: लॉकडाऊन काळात महाराष्ट्र पोलिसांवर हल्ल्याच्या 200 घटना, 732 जणांना अटक

महाराष्ट्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 23 मार्च 2020 ते 10 मे 2020 या काळात भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये 101,316 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांवरील हल्ल्याच्या 200 घटना घडल्या. तर सुमारे 87,893 नागरिकांनी 100 हा तत्काळ मदत क्रमांक वापरुन मदत घेतली. बेकायदेशीर वाहतुकीचे 1,291 गुन्हे दाखल झाले. 55,650 वाहने जप्त करण्यात आली.

Maharashtra Police | (File Photo)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट दूर रहावे. कोविड 19 विषाणूने नागरिकांच्या शरीरात शिरकाव करु नये. यासाठी महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) आपले कर्तव्य मोठ्या निष्ठेने पार पाडत आहे. हे कर्तव्य पार पाडताना पोलिसांनाही कोरोनाची लागण होण्याचा धोका प्रचंड मोठा आहे. काही पोलिसांना कोरोना व्हायरस संक्रमन झालेही आहे. असे असतानच काही समाज कंटक मात्र पोलिसांवरच हल्ले करत आहेत. महाराष्ट्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत महाराष्ट्रात 23 मार्च 2020 ते 10 मे 2020 या काळात पोलिसांवरील हल्ल्याच्या एकूण 200 घटना घडल्या आहेत. या घटना प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 732 जणांना ताब्यात घेतले आहे.

महाराष्ट्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 23 मार्च 2020 ते 10 मे 2020 या काळात भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये 101,316 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांवरील हल्ल्याच्या 200 घटना घडल्या. तर सुमारे 87,893 नागरिकांनी 100 हा तत्काळ मदत क्रमांक वापरुन मदत घेतली. बेकायदेशीर वाहतुकीचे 1,291 गुन्हे दाखल झाले. 55,650 वाहने जप्त करण्यात आली. 3,82,27,794 रुपये इतका दंड विविध गुन्ह्यांमद्ये आणि नियमांच्या उल्लंघनाप्रमाणे आकारण्यात आला. समाज कंटकांनी हल्ला केल्याच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये 80 पोलीस जखमी झाले, असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

एएनआय ट्विट

दम्यान, महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकाऱ्यांसह एकूण 786 कर्मचारी COVID19 पॉझिटीव्ह आढळले आहेत. कोरोना व्हायरस संक्रमित 786 जणांपैकी 703 जणांवर रुग्णालात उपचार सुरु आहेत. 76 जणांची प्रकृती उपचारानंतर सुधारल्याने आणि बरे वाटू लागल्याने त्यांना रुग्णालातून सुट्टी (डिस्चार्ज) देण्यात आला आहे. तर आतापर्यंत 7 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक पोस्ट लिहून ही माहिती दिली आहे. (हेही वाचा, Coronavirus: महाराष्ट्र पोलीस दलातील 786 कर्मचारी COVID-19 पॉझिटीव्ह; 88 अधिकाऱ्यांसह 698 पोलिसांचा समावेश)

महाराष्ट्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 786 कोरोना पॉझिटीव्ह कर्मचाऱ्यांमध्ये एकूण 88 पोलीस अधिकारी तर 698 पोलिसांचा समावेश आहे. 88 पैकी 75 पोलीस अधिकाऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर 13 अधिकारी आणि 63 पोलीसांची प्रकृती उपचारानंतर सुधारली आहे. त्यांना बरे वाटू लागल्याने रुग्णालयातून सुट्टी (डिस्चार्ज) देण्यात आला आहे

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement