कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांकडून व्हॉट्सअॅप ग्रुपच्या अॅडमीनसाठी महत्वाची सूचना
सध्या भारतातही कोरोनोबाधीत रुग्णांच्या आकड्यात वाढ होऊ लागली आहे. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात (Maharashtra) अधिक रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी करणे अतिशय महत्वाचे आहे. यासाठी राज्य शासनाकडून ठोस पावले उचलली जात आहे.
कोरोना व्हायरस (Coronavirus) संपूर्ण जगात थैमान घातले आहे. सध्या भारतातही कोरोनोबाधीत रुग्णांच्या आकड्यात वाढ होऊ लागली आहे. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात (Maharashtra) अधिक रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी करणे अतिशय महत्वाचे आहे. यासाठी राज्य शासनाकडून ठोस पावले उचलली जात आहे. राज्यातील महत्वाची शहरे आणि जिल्ह्याच्या सिमा बंद करुन संपूर्ण राज्यात जमावबंदीचे (Section 188) आदेश लागू केले आहेत. मात्र, काही भागात सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून चुकीच्या माहितीचा प्रसार केला जात आहे. अशाप्रकारच्या अफवांना रोखण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी (Kolhapur Police) महत्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांनी व्हाट्सऍप ग्रुपच्या ऍडमीनसाठी (WhatsApp Group Admin) महत्वाची सूचना दिली आहे. तसेच व्हॉट्सऍपच्या सेटिंगमध्ये बदल करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
देशामधील करोनाग्रस्तांची संख्या 513 वर पोहचली आहे. तर महाराष्ट्रात ही संख्या 107 वर पोहचली आहे. तर करोनामुळे आत्तापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. याच करोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलली असून नागरिकांना घरात राहण्याचेही आवाहन केंद्र तसेच राज्य सरकारे करत आहेत. भारतातील 548 जिल्हे लॉकडाउन करण्यात आले असून 30 राज्ये सध्या लॉकडाउन आहेत. महाराष्ट्र आणि पंजाब या दोन्ही राज्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकीकडे सरकारकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात असतानाच दुसरीकडे सोशल नेटवर्किंगवर अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. व्हॉट्सऍपवर कोरोनाबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर रोख लावण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी ग्रुप ऍडमिनसाठी ट्वीट केले आहे. सर्व ग्रुप अडमिन यांनी नोंद घ्या, की व्हाट्सअँप फेसबुक वरून अफवा पसरविल्या जात आहेत. तरी सर्व ग्रुप अडमिन यांनी आपल्या ग्रुपच्या सेटिंग मध्ये जाऊन only admin अशी सेटिंग करून घ्या, अफवा प्रसार थांबवुया, असा आशायाचे ट्वीट केले आहे. (हे देखील वाचा- Thane: 2002 बांग्लादेश बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला 16 वर्षांनी ठाणे पोलिसांकडून अटक)
ट्वीट-
राज्य सरकार तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, तरीही नागरिक बाहेर पडत असल्याने पोलीस रस्त्यावर उतरून कारवाई करत आहेत. जळगावात ठिकठिकाणी कारवाई सुरु आहे. पोलीस आदेश न पाळणाऱ्या नागरिकांना लाठ्यांचा प्रसाद देत आहेत. काहींना उठबशा काढण्याचीही शिक्षा केली जात आहे.