Coronavirus चा आंबा निर्यातीलाही फटका बसण्याची शक्यता

तसेच आंतरराष्ट्रीय हवाई उड्डाणे पूर्णपणे बंद झाल्याने आंबा निर्यात कसा करायचा असा मोठा प्रश्न आंबे विक्रेत्यांना पडला आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Youtube)

कोकणचा राजा हापूस आंब्याची (Alphonso Mango) ख्याती इतकी आहे की देश-विदेशात त्याची निर्यात केली जाते. मात्र यंदा संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसचे लोण पसरल्यामुळे याचा फटका कोकणातील (Konkan) आंबे निर्यातीला देखील बसण्याची भीती व्यक्त करण्यात येतेय. तसेच आंतरराष्ट्रीय हवाई उड्डाणे पूर्णपणे बंद झाल्याने आंबा निर्यात कसा करायचा असा मोठा प्रश्न आंबे विक्रेत्यांना पडला आहे. समुद्रमार्गे वाहतुक सुरु आहे. पण ऐन हंगामात निर्बंध राहिले तर त्याचा निर्यातीला फटका बसू शकतो.

कोरोना व्हायरस हा आता संपूर्ण जगभरात पसरले असून महाराष्ट्रातही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे परदेशी हवाई उड्डाणे देखील त्यामुळे अनेक उत्पादनांची आयात-निर्यात देखील बंद झाली आहे. त्याचा ऐन आंब्याच्या हंगामात ही समस्या निर्माण झाल्याने आंबे निर्यातीलाही त्याचा फटका बसणार आहे. COVID-19: कोरोना के बजायेंगे बारा.. Coronavirus हटवण्यासाठी रामदास आठवले यांनी उगारले कवितेचे अस्त्र

कोकणातून वाशीच्या घाऊ क बाजारपेठेत जाणाऱ्या आंब्यापैकी सुमारे चाळीस टक्के मालाची निर्यात होते. त्यातील बहुतांश माल आखाती देशांमध्ये जातो. निर्यात सुरळीत चालू राहिली तर माल बाजारातून बाहेर पडतो. त्याचा साठा पडून राहत नाही. दर स्थिर ठेवण्यात निर्यातीचा वाटा अधिक असतो. त्यामुळे निर्यात थांबली तर बाजारातील दर झपाटय़ाने घसरु शकतात.

लोकसत्ता ने दिलेल्या माहितीनुसार, सध्या वाशी बाजारात आंब्याची आवक जास्त नाही. मात्र पुढील महिन्यात ती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हीच परिस्थिती कायम राहिली तर आंबा उत्पादकांना त्याचा फटका बसका बसू शकतो.

कोरोना विषाणूच्या (Corona Virus) संसर्गामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. या उद्भवलेल्या आपत्तीचा परिणाम अनेक उद्योगधंद्यावरही होत आहे. शुक्रवारी जगातील सर्वाधिक उत्पादन क्षमता असणारी कार फॅक्टरी तात्पुरती बंद झाली. दक्षिण कोरियाची ऑटोमोबाईल कंपनी ह्युंदाईने (Hyundai) सध्या आपल्या सर्वात मोठ्या उलासन प्लांटचे काम बंद केले आहे.