Maharashtra Covid Restrictions: महाराष्ट्रात कोरोना निर्बंध कठोरच राहण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संकेत

त्यामुळे तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका टाळण्यासाठी आणि होणारी गर्दी रोखण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. तसेच, केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर हे निर्बध कायम ठेवण्याबाबतचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

Uddhav Thackeray | (File Photo)

राज्यात कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारीच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव काहीसा ओसरताना दिसतो आहे. त्यामुळे आता कोरोना निर्बंध (Maharashtra Covid Restrictions) काहीसे अधिक शिथील करावे अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मात्र ही अपेक्षा पूर्ण न होण्याचे संकेत दिले आहेत. राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक काल पार पडली. या बैठकीत राज्यातील कोरोना व्हायरस संसर्गाची दुसरी लाट काहीशी ओसरते आहे. त्यामुळे निर्बंध शिथिल करावेत अशी भूमिका काही मंत्र्यांनी मांडली. मात्र, दुसरी लाट कमी आली असली तरी रुग्णसंख्येत म्हणावी त्या प्रमाणात आजही घट नाही. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका टाळण्यासाठी आणि होणारी गर्दी रोखण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. तसेच, केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर हे निर्बध कायम ठेवण्याबाबतचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

केंद्रीय गृहमंत्रालयाचे आदेश काय?

केंद्रीय गृहमंत्रालयाने आदेश दिले आहेत की, कोरोना दुसरी लाट काहीशी ओसरली असली तरी रुग्णसंख्येत अपेक्षीत घट झाली नाही. त्यामुळे कोरोनाची तिसरी संभाव्य लाट रोखण्यासाठी आणि गर्दी टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करा, असे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आहेत.

मागणी काय?

मंत्रिमंडळातील बैठकीत कोरोना निर्बंधाचे पडसाद पाहायला मिळाले. कोरोना निर्बंधांचा व्यवसाय आणि उद्योगावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे आर्थिक गणीत ठिक करण्यासाठी निर्बंध शिथील करावेत. प्रामुख्याने दुकानांच्या वेळांमध्ये वाढ करावी. सध्यास्थितीत सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी आहे. तसेच अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने बंद ठेवावी लागत आहेत. शनिवारी, रविवारी सर्व दुकाने बंद ठेवावी लागतात. त्यामुळे हे सर्व निर्बंध शिथील करण्यात यावेत अशी मागणी वाढली आहे. या मागणीच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळात जोरदार पडसाद उमटले. ज्या भागात कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी आहे त्या भागात दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मान्यता द्यावी अशी मागमी काही मंत्र्यांनी केली. परंतू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मागणीस नकार दिला. (Ganpati Festival 2021 Special Trains: बाप्पा पावला! मध्य रेल्वेकडून गणेशोत्सवानिमित्त विशेष गाड्यांची घोषणा)

पंतप्रधान घेणार बैठक

दरम्यान,देशातील कोरोना व्हायरस स्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी एक बैठक घेणार आहेत. या बैठकीस महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश व तमिळनाडू आदी राज्यांसह विविध राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित असणार आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेवर या बैठकीत चर्चा होणार आहे. त्यामुळे या बैठकीनंतर कोरोना निर्बंधांबाबत पुढील दिशा स्पष्ट होईल. तोपर्यंत कोरोना निर्बंध शिथील करण्याचा प्रश्न येत नसल्याचे सांगण्यात आले.