Coronavirus: राज्यात आतापर्यंत 51 पोलीस अधिकारी आणि 310 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

या सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी 23 पोलीस अधिकारी व 26 कर्मचारी कोरोना मुक्त झाले असून उरलेल्या 28 पोलीस अधिकारी व 281 पोलीस कर्मचारी यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुर्देवाने 3 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

Police| (Photo Credits: Maharashtra Police Twitter)

Coronavirus: राज्यात आतापर्यंत 51 पोलीस अधिकारी आणि 310 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी 23 पोलीस अधिकारी व 26 कर्मचारी कोरोना मुक्त झाले असून उरलेल्या 28 पोलीस अधिकारी व 281 पोलीस कर्मचारी यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुर्देवाने 3 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी राज्यातील पोलिस यंत्रणा, डॉक्टर्स आपल्या प्राणाची बाजी लावत आहेत. पंरतु, आतापर्यंत लॉकडाऊन काळात पोलिसांवर हल्ला होण्याच्या 173 घटनांची नोंद झाली आहे. यातील 659 आरोपींना अटक करण्यात आली आहे. (हेही वाचा - पंजाब मधील लवली प्रोपेशनल युनिव्हर्सिटीत लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील 200 विद्यार्थी अडकले: गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विद्यार्थ्यांशी साधला संवाद: पहा व्हिडिओ)

महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. नागरिकांना लॉकडाऊनचे पालन करावे यासाठी पोलिस 24 तास रस्त्यांवर गस्त घालत आहेत. मात्र, अनेक ठिकाणी नागरिकांनी पोलिसांवर हल्ला चढवल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांचे व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.