Coronavirus Update: महाराष्ट्रातील तुम्ही राहत असणाऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण? जाणून घ्या कोरोनाबाधितांची मनपा आणि जिल्हानिहाय आकडेवारी

कोरोना संकटात तुम्ही राहत असणारा जिल्हा किंवा महानगरपालिका सध्या काय स्थितीत आहे? तुमच्या शहरात एकुण कोरोनाचे किती रुग्ण आहेत हे आता आपण सविस्तर जाणुन घेउयात..

Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा (Coronavirus Updates In Maharashtra) आकडा दिवसागणिक वाढतच आहे. कालच्या दिवसभरातील अपडेटनुसार राज्यातील कोरोना रुग्णांची संंख्या आता 50 हजाराच्या पार गेली आहे. काल 24 मे रोजी रात्री दहा वाजेपर्यंत राज्यात कोरोनाचे 3041 नवे रुग्ण आणि 58 मृत्यू नोंदवले गेले होते. यानुसार राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 50,231 वर पोहचली होती. यापैकी 1, 635 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला असुन 14,600 जणांनी या जीवघेण्या विषाणुवर मात केली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबई (Mumbai) शहरात कोरोनाचे सर्वाधिक म्हणजे 30,542 कोरोना रुग्ण असुन यापैकी 988 जणांचा आज वर मृत्यु झाला आहे. तर मुंबई पाठोपाठ ठाणे जिल्हा,पुणे मनपा,औरंगाबाद, नाशिक या ठिकाणी बहुतांश कोरोना रुग्ण आढळले आहेत. हे जिल्हे महाराष्ट्रातील मुख्य रेड झोनआहेत. महाराष्ट्रातील कोणते जिल्हे रेड,ऑरेंज आणि ग्रीन झोन मध्ये आहेत जाणुन घेण्यासाठी क्लिक करा.

राज्याचे आरोग्यमंंत्री राजेश टोपे यांंनी दिलेल्या माहितीनुसार, काल पर्यंत विविध जिल्ह्यात एकुण 3, 62, 862  कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामधुन केवळ 50,231 जणांची चाचणी ही कोरोना पॉझिटिव्ह आहे. तसेच राज्यात कोरोनातुन रिकव्हर होणार्‍यांची संख्या सुद्धा बरीच दिलासादायक आहे. या कोरोना संकटात तुम्ही राहत असणारा जिल्हा किंवा महानगरपालिका सध्या काय स्थितीत आहे? तुमच्या शहरात एकुण कोरोनाचे किती रुग्ण आहेत हे आता आपण सविस्तर जाणुन घेउयात..

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांंची मनपा आणि जिल्हानिहाय आकडेवारी (24-25 May 2020 Updates) 

अ.क्र. जिल्हा/मनपा बाधित रुग्ण मृत्यू
1 मुंबई मनपा 30, 542 988
2 ठाणे 420 4
3 ठाणे मनपा 2590 36
4 नवी मुंबई मनपा 2007 29
5 कल्याण डोंबिवली मनपा 889 7
6 उल्हासनगर मनपा 189 3
7 भिवंडी निजामपूर मनपा 86 3
8 मीरा भाईंदर 464 5
9 पालघर 114 3
10 वसई विरार मनपा 562 15
11 रायगड 412 5
12 पनवेल मनपा 330 12
ठाणे मंडळ एकूण 38, 585 1110
1 नाशिक 115 0
2 नाशिक मनपा 110 2
3 मालेगाव मनपा 711 44
4 अहमदनगर 53 5
5 अहमदनगर मनपा 20 0
6 धुळे 23 3
7 धुळे मनपा 95 6
8 जळगाव 294 36
9 जळगाव मनपा 117 5
10 नंदुरबार 32 2
नाशिक मंडळ एकूण 1570 103
1 पुणे 340 5
2 पुणे मनपा 5075 251
3 पिंपरी-चिंचवड मनपा 267 7
4 सोलापूर 24 2
5 सोलापूर मनपा 522 32
6 सातारा 279 5
पुणे मंडळ एकूण 6562  309
1 कोल्हापूर 236 1
2 कोल्हापूर मनपा 23 0
3 सांगली 69 0
4 सांगली मिरज कुपवाड मनपा 11 1
5 सिंधुदुर्ग 10 0
6 रत्नागिरी 155 3
कोल्हापूर मंडळ एकूण 504 5
1 औरंगाबाद 23 0
2 औरंगाबाद मनपा 1233 46
3 जालना 56 0
4 हिंगोली 112 0
5 परभणी 17 1
6 परभणी मनपा 5 0
औरंगाबाद मंडळ एकूण 1446 47
1 लातूर 67 3
2 लातूर मनपा 4 0
3 उस्मानाबाद 31 0
5 बीड 26 0
6 नांदेड 15 0
7 नांदेड मनपा 83 5
लातूर मंडळ एकूण 226 8
1 अकोला 36 2
2 अकोला मनपा 366 15
3 अमरावती 13 2
4 अमवरावती मनपा 155 12
5 यवतमाळ 115 0
6 बुलढाणा 40 3
7 वाशीम 8 0
अकोला मंडळ एकूण 733 34
1 नागपूर 7 0
2 नागपूर मनपा 464 7
3 वर्धा 4 1
4 भंडारा  10 0
5 गोंदिया 39 0
6 चंद्रपूर 10 0
7 चंद्रपूर मनपा 9 0
8 गडचिरोली 13 0
नागपूर मंडळ एकूण 556 8
1 इतर राज्य 49 11
एकूण 50,231  1635 

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांंनी सद्धा काल राज्यातील जनतेशी संवाद साधताना येत्या काही काळात कोरोनाची परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता वर्तवली. या संकटाला सामना करण्यासाठी राज्य सरकार सक्षम आहे असा विश्वास सुद्धा ठाकरे यांनी व्यक्त केला. तसंच राज्यात 31 मे नंतर लॉकडाउन हळुहळु कमी करुन व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही ठाकरे यांनी सांगितले होते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif