Constitution Bench Live Streaming: शिवसेना कोणाची? सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी येथे पाहा थेट
ही सुनावणी राज्याच्या राजकारणातील महत्त्वपूर्ण असलेल्या शिवसेना पक्षासंदर्भातील आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना कोणाची हा प्रश्न निर्माण झाला. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात होणारी ही सुनावणी देशातील जनतेला थेट पाहता येणार आहे. आपण ती इथे पाहू शकता.
सर्वोच्च न्यायालयात उद्या महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची सुनावणी पार पडत आहे. ही सुनावणी राज्याच्या राजकारणातील महत्त्वपूर्ण असलेल्या शिवसेना पक्षासंदर्भातील आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना कोणाची हा प्रश्न निर्माण झाला. प्रकरण न्यायालयात गेले. याच प्रकरणात आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे गट यांच्यातील सुनावणी उद्या पार पडत आहे. शिवायया प्रकरणाशी संबंधीत इतरही मुद्द्यांवर सुनावणी पार पडत आहे. ही सुनावणी देशातील जनतेला लाईव्ह स्ट्रिमींगमध्ये थेट पाहता येणार आहे. आपण ती इथे पाहू शकता.
ट्विट