Rahul Gandhi Birthday: राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस कार्यकर्त्यांची गरजूंना मदत
देशातील कोरोना व्हायरसचं (Coronavirus) संकट आणि चीन सीमेवर भारताचे 20 जवान शहीद झाल्यामुळे यंदा राहुल गांधी आपला वाढदिवस साजरा करणार नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कोणताही जाहीर कार्यक्रम न करता गरजूंना मदत करून राहुल गांधी यांचा वाढदिवस साजरा करणार असल्याचं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी सांगितलं आहे.
Rahul Gandhi Birthday: काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा आज जन्मदिवस (Birthday) आहे. देशातील कोरोना व्हायरसचं (Coronavirus) संकट आणि चीन सीमेवर भारताचे 20 जवान शहीद झाल्यामुळे यंदा राहुल गांधी आपला वाढदिवस साजरा करणार नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कोणताही जाहीर कार्यक्रम न करता गरजूंना मदत करून राहुल गांधी यांचा वाढदिवस साजरा करणार असल्याचं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी सांगितलं आहे.
राहुल गांधी यांच्या वाढदिवसा निमित्त राज्यातील गरीब, गरजू, कामगार, झोपडपट्टीतील नागरिक, असंघटीत कामगार अशा 5 लाख गरजूंना कम्युनिटी किचनच्या माध्यमातून फूड पॅकेट्सचे वाटप केले जाणार आहे. जेवणाची पंगत न घालता लोकांच्या घरी जाऊन या पॅकेटचे वाटप केलं जाणार आहे. याशिवाय गरजू नागरिकांना अन्नधान्याच्या किटचेदेखील वाटप करण्यात येणार आहे. तसेच कोरोनाच्या संकटकाळात रक्ताचा तुटवठा निर्माण होऊ नये, यासाठी राज्यभरात रक्तदान शिबिरं आयोजित करण्यात येणार आहेत. (हेही वाचा - MPSC Mains Final Result 2019: राज्यसेवा मुख्य परीक्षा निकाल जाहीर; mpsc.gov.in वर पाहता येणार निकाल, कट ऑफ, मेरिट लिस्ट)
दरम्यान, गेल्या तीन महिन्यांपासून कोरोना विरोधातील लढाईत योद्धा बनलेल्या डॉक्टर्स, नर्स, पोलीस कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच पोलिसांना रेनकोट, डॉक्टर, नर्सेस यांना PPE कीट, सॅनिटायझर वाटप केले जाणार आहे. सरकारी अधिकारी कर्मचारी यांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांना इम्युनिटी बुस्टर, मास्क, सॅनिटायझर यांचे वाटप करण्यात येणार आहे. याशिवाय सेवाभावी संस्थांना अन्नधान्य आणि गरजेच्या वस्तू देण्यात येणार आहेत.(हेही वाचा - सिंधुदुर्ग येथील आरटीपीसीआर आणि रेण्वीय निदान प्रयोगशाळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन)
याशिवाय राज्यातील सर्वासामान्य नागरिकांना महिला बचत गटांनी तयार केलेल्या 5 लाख मास्कचे वाटप करण्यात येणार आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सरकराने घालून दिलेल्या सर्व अटी, नियमांचे तसेच सोशल डिस्टंसिंगचे पालन करून राहुल गांधींच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गरजूंना मदत करावी, असं आवाहनही बाबासाहेब थोरात यांनी केलं आहे.