Nana Patole In Delhi: नाना पटोले दिल्ली दरबारी; मुंबईपाठोपाठ, महाराष्ट्रातही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचाली?
नाना पटोले यांना अध्यक्षपदावरुन हटवावा यासाठी काँग्रेसच्या काही नेत्यांनी दिल्लीमध्ये जाऊन भेटीगाठी घेतल्या.
राज्यात काँग्रेसपक्ष अंतर्गत खांद्येपालट सुरूच आहे. मुंबई अध्यक्ष बदलल्यानंतर आता प्रभारी बदलण्याची हालचाल सुरू आहे. त्याचं सोबत प्रदेश अध्यक्ष पद टिकवण्यासाठी आणि बदलण्यासाठी दोन्हीही बाजूने जोरदार हालचाली सुरू आहे आणि त्यासाठी पुन्हा एकदा नेत्यांच्या दिल्लीवारी सुरू झालेल्या आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गेले दोन दिवसांपासून दिल्लीमध्ये ठाण मांडून आहेत. नाना पटोले यांनी जरी हा दावा केला असला तरी मात्र अद्याप ही पक्षाअंतर्गत सुरु असलेलं शितयुद्ध संपलेल नाही. यासाठी काँग्रेस नेत्यांच्या दिल्लीवारी सुरूच आहे. (हेही वाचा - Eknath Shinde Vs Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांनी अखेर 'त्या' वादग्रस्त जाहिरातीवर मौन सोडलेच, काय म्हणाले घ्या जाणून)
काही दिवसांपूर्वी अशोक चव्हाण यांनी दिल्लीतील गाठाभेटी घेतली होती. नाना पटोले यांना अध्यक्षपदावरुन हटवावा यासाठी काँग्रेसच्या काही नेत्यांनी दिल्लीमध्ये जाऊन भेटीगाठी घेतल्या. त्यानंतर दोन दिवस स्वतः अशोक चव्हाण हे दिल्लीमध्ये ठाण मांडून बसलेले होते. त्यानंतर नाना पटवले यांचे काही समर्थक नसीम खान यांच्यासह दिल्लीमध्ये जाऊन त्यांनी नाना पटोले यांची बाजू लावून धरली आणि आता पुन्हा एकदा दोन दिवसापासून दिल्लीमध्ये नाना पटोले ठाण मांडून बसलेले आहेत.
महाराष्ट्रातील काही नेते नानांच्या विरोधामध्ये आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, केसी वेणुगोपाल आणि प्रभारी एचके पाटील यांच्याशीफार सौख्य नाही. नाना पटोले यांचा आक्रमक आणि एकला चलो रे स्वभावामुळे महाविकास आघाडीतील नेतेही फार चांगले संबंध नाही. ही जरी नाना पटोले यांची कमकुवत बाजू असली तरी राहुल गांधीच्या नजरेत नाना पटोले यांची इमेज अद्याप वेगळी पाहायला मिळते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट असताना नेतृत्वावर टीका करत त्यांनी राजीनामा दिला होता.