Nana Patole: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा गंभीर आरोप; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार माझ्यावर पाळत ठेवतात

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) हे आपल्यावर पाळत ठेवतात असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

Nana Patole | (Photo Credits: twitter)

काँग्रेस (Congress ) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी एक गंभीर आणि खळबळजन विधान केले आहे. या विधानामुळे महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारमध्ये बिघाडी होण्याची चिन्हे आहेत. नाना पटोले यांनी म्हटले आहे की, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) हे आपल्यावर पाळत ठेवतात. खरे तर नाना पटोले यांचा हा गंभीर आरोपच आहे. लोणावळा (Lonavla) येथील काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर बोलताना नाना पटोले यांनी हे आरोप केले आहेत. आपण स्वबळाची भाषा केल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे, अशी पुस्तीही पटोले यांनी आपल्या विधानासोबत जोडली. नाना पटोले यांच्या विधानामुळे महाविकासआघाडीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

नाना पटोले यांनी मध्यंतरी काँग्रे पक्ष आगामी निवडणुका स्वबळावर लढेल असे विधान केले होते. या विधानाबबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाध्यक्ष शरद पवार यांना प्रसारमाध्यमांनी विचारले असता, नाना पटोले यांच्यासाहख्या लहान व्यक्तींवर मी बोलत नाही, असे म्हणत पवार यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. दुसऱ्या बाजूला महाविकासआघाडी सरकार स्थिर आहे. त्यांच्यात कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत, असे पवार यांनी म्हटले आहे. दरम्यान, आघाडीतील नेत्यांची वक्तव्ये पाहता महाविकासआघाडीत सर्व काही अलबेल आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे. (हेही वाचा, Maharashtra: 'नाना पटोले हे महाराष्ट्रातील पप्पू' चंद्रकांत पाटील यांचा टोला)

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोर देत पुनरुच्चार केला होता की, राज्यात महाविकासआघाडीचे सरकार आहे. या सरकारमध्ये काँग्रेस सहभागी आहे. असे असले तरी आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढेन. महाविकासाघाडीत आमचे मित्रपक्ष आहेत. हे आमचे मित्रपक्ष असले तरी निवडणुकांमध्ये त्यांचे प्लॅनिंग वेगळे असेल. आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून वेगळे लढतो आहोत. आमची तयारी त्यादृष्टीने सुरु झाल आहे. राष्ट्रवादी आमचा मित्रपक्षच आहे. त्यामुळे एकत्र बसल्यावर काय निर्णय होतो ते पाहू. परतू, आजघडीला तरी आमच्याकडे कोणताही प्रस्ताव नसल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे. त्यामुळे आघाडीत नेमके काय सुरु आहे, असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement