Nana Patole On Modi Goverment: 'देशाने स्वातंत्र्यानंतर कमवलेले मोदी सरकारने 7 वर्षात विकायला काढले' काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका

पंतप्रधान मोदी यांनी आजच्या दिवशीच 2014 मध्ये पहिल्यांदाच पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती.

Nana Patole, Naredra Modi (Photo Credit: PTI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील एनडीए (NDA) सरकारला केंद्रात सत्ते एकून सात वर्ष पूर्ण झाले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी आजच्या दिवशीच 2014 मध्ये पहिल्यांदाच पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. एकीकडे, केंद्रातील सत्तेत सात वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजप नेत्यांकडून सरकारच्या कामांना उजाळा देण्याचा प्रयत्न होत आहे. तर, दुसरीकडे काँग्रेसने (Congress) केंद्र सरकराविरोधात राज्यभरात निर्दशने सुरु केली आहेत. दरम्यान, भारताने स्वातंत्र्यानंतर जे कमवले ते मोदी सरकारने 7 वर्षात विकायला काढले आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

दरम्यान, पत्रकारांशी बोलत असताना नाना पटोले यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. मोदी सरकार हे सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. महागाई प्रचंड वाढल्याने लोकांना जगणे कठीण झाले आहे. पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, खाद्यतेल सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. कोरोना महामारीत तर मोदी सरकारने अत्यंत बेजबाबदारपणा केला. लाखो लोक ऑक्सीजन, औषधांअभावी मरण पावले आहे. तसेच देशाने 70 वर्षात जे कमवले, ते मोदी सरकारने 7 वर्षात विकायला काढले आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केले आहे. हे देखील वाचा- Mumbai: इंधन दरवाढ, कोविड व्यवस्थापन या मुद्द्यांवरुन कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी काळ्या फिती बांधून नोंदवला केंद्राविरुद्ध निषेध

काँग्रेसने आजचा दिवस काळा दिवस पाळून राज्यभर मोदी सरकारचा निषेध केला. मोदी सरकारच्या सात वर्षांच्या काराभाराचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने आज जिल्हा-तालुका स्तरावर काळ्या फिती लावून निदर्शने केली. नाना पटोले यांच्यासह मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस संदेश कोंडविलकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif