शरद पवार यांनी दाखला देताच शिवसेनेला पाठिंबा देण्यास सोनिया गांधी झाल्या राजी, उलघडलं गुपीत
शरद पवार यांनी पुढे म्हटले आहे की, शिवेसना पक्षाचे राजकारण पाहता काँग्रेसने टोकाचा विरोध करणे स्वाभाविक आहे. पण, मी त्यांच्या निदर्शनास आणून दिले की, काँग्रेसने इतका टोकाचा विरोध करण्याची काहीच आवश्यकता नाही. कारण, इंदिरा गांधी यांनी देशात आणिबाणी लागू केली तेव्हा, शिवेसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे इंदिरा गांधी यांना पाठिंबा दर्शवणारे पहिले राजकीय नेते होते.
काँग्रेस (Congress) पक्षाने आक्रमक हिंदुत्व माणणाऱ्या शिवसेना (Shiv Sena) पक्षास पाठिंबा दिलाच कसा? महत्त्वाचे म्हणजे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Bal Thackeray), विद्यमान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) तसेच, शिवसेना मुखपत्र दै. सामनातून गांधी नेहरु कुटुंबीयांवर येथेच्छ टीका करण्यात आलेली असताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी ( Sonia Gandhi) या पाठिंब्यास राजी झाल्याच कशा? याबाबत महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणातही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, हे आश्चर्य कायम असताना या सर्व खेळाचे सूत्रधार असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी हे गुपीत उघड केले आहे. एबीपी माझा खासगी वृत्तवाहीणीस दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी हे गुपीत उघड केले आहे.
शिवसेनेला काँग्रेसचा नाट्यपूर्ण पाठिंबा ही कथा उलघडून सांगताना शरत पवार यांनी म्हटले की, शिवसेना पक्षाला पाठिंबा द्यायालया काँग्रेस अध्यक्षा अजिबात राजी नव्हत्या. काँग्रेस आणि शिवसेना या पक्षात टोकाचे अंतर आहे. त्यामुळे शिवसेना पक्षास पाठिंबा देणयास त्या राजी नव्हत्या. मात्र, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या एक बाब निदर्शनास आणून दिली. ती म्हणजे नव्याने निवडूण आलेल्या काँग्रेस आमदारांमधील बहुसंख्य आमदार हे भाजपला वगळून सरकार बनविण्यास अनुकूल आहेत. या नंतर त्यांनी त्यांच्या आमदार आणि नेत्यांशीही चर्चा केली. त्यांचा शिवसेना पाक्षासोबत राष्ट्रीय पातळीवर आघाडी करण्यास होता. परंतू राज्य पातळीवर विरोध करण्यात त्यांचा तितका विरोध दिसला नाही, असेही पवार म्हणाले.
शरद पवार यांनी पुढे म्हटले आहे की, शिवेसना पक्षाचे राजकारण पाहता काँग्रेसने टोकाचा विरोध करणे स्वाभाविक आहे. पण, मी त्यांच्या निदर्शनास आणून दिले की, काँग्रेसने इतका टोकाचा विरोध करण्याची काहीच आवश्यकता नाही. कारण, इंदिरा गांधी यांनी देशात आणिबाणी लागू केली तेव्हा, शिवेसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे इंदिरा गांधी यांना पाठिंबा दर्शवणारे पहिले राजकीय नेते होते. आणबाणीनंतर देशभरात लागू झालेल्या निवडणुकीत शिवसेना पक्षाने उमेदवारही उभे केले नव्हते. इतकेच नव्हे तर, ठाणे महापालिकेतही निवडूण आलेल्या नगरसेवकांना राजीनामा द्यायला लाऊन बाळासाहेबांनी काँग्रेसला सहकार्य केले होते, अशी आठवण शरद पवार यांनी काँग्रेसला करुन दिली. (हेही वाचा, अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ठेवली होती 'ही' अट; शरद पवार यांनी केला गौप्यस्फोट)
दरम्यान, शिवसेना एनडीएची घटक पक्ष होती. परंतू, तरीही राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेना पक्षाने प्रतिभाताई पाटील, प्रणव मुखर्जी आदी काँग्रेस उमेदवारांना दिलखुलासपणे पाठिंबा दिला होता अशी आठवणही आपण सोनिया गांधी यांना करुन दिल्याचे शरद पवार यांनी सांगितले. या सर्व बाबी निदर्शनास आणून दिल्यानंतर सोनिया गांधी या शिवसेना पक्षास पाठिंबा देण्यास तयार झाल्या आणि महाविकासआघाडी उदयास आली, असे शरद पवार म्हणाले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)