Lok Sabha Elections 2019: पुणे लोकसभा मतदार संघात उमेदवाराशिवाय महाआघाडीचा प्रचार सुरु; 4 एप्रिल उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख

या लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 4 एप्रिल आहे. पण अजूनही काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाला या मतदारसंघात उमेदवार सापडत नाही.

congress | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Pune Lok Sabha Constituency: 23 एप्रिलला पुण्यामध्ये लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. या लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 4 एप्रिल आहे. पण अजूनही काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाला या मतदारसंघात उमेदवार सापडत नाही. काही वेळापूर्वी काँग्रेस पक्षाने दोन उमेदवारांची यादी केली मात्र त्यामध्ये पुण्याच्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. आज पुण्यात महाआघाडीकडून प्रचाराला उमेदवाराशिवायच सुरुवात करण्यात आली आहे. Lok Sabha Elections 2019 या निवडणुकीत मतदार यादीत नाव, पत्ता नोंदवण्यासाठी 1950 या हेल्पलाईन नंबरची मदत कशी घ्याल?

भाजपाने पुण्यात गिरीश बापट यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आता त्यांच्या विरोधात महाआघाडी कोणाला उमेदवारी देणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरले आहे. संजय काकडे काँग्रेसमध्ये प्रवेश करून पुण्यातून काँग्रेसच्या तिकिटावर उभे राहणार होते मात्र मुख्यमंत्र्यांना काकडेंची मनधरणी करण्यात यश आले आहे. आता लावणीसम्राट सुरेखा पुणेकरांचे नाव चर्चेमध्ये आहे. तसेच काही दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांचे नाव देखील चर्चेमध्ये आहे. लोकसभा निवडणुक 2019, राम नवमी, महाराष्ट्र दिन आणि मतमोजणी यामुळे मुंबई, पुणे, ठाणे सह महाराष्ट्रात एपिल-मे महिन्यात 5-7 दिवस ड्राय डे; पहा संपूर्ण यादी

काँग्रेसचे साथीदार राष्ट्रवादी पक्ष आयत्या वेळेस पुण्यात उमेदवार उभा करण्यास तयार नाही अशी भूमिका अजित पवारांनी घेतल्यानंतर आता काँग्रेसपुढेही मोठा पेच निर्माण झाला आहे.