कॉंग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांचा युतीच्या लोकसभा उमेदवार राहुल शेवाळे यांना पाठिंबा जाहीर; भाजप प्रवेशाचे संकेत
कॉंग्रेसचे वडाळा विधानसभा मतदारसंघाचे (Wadala Assembly Constituency) आमदार कालिदास कोळंबकर (Kalidas kolambkar) आता भाजपा-शिवसेना युतीचे दक्षिण मध्य मुंबईचे लोकसभा उमेदवार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांचा प्रचार करणार आहेत.
Lok Sabha Election 2019: कॉंग्रेसचे वडाळा विधानसभा मतदारसंघाचे (Wadala Assembly Constituency) आमदार कालिदास कोळंबकर (Kalidas kolambkar) आता भाजपा-शिवसेना युतीचे दक्षिण मध्य मुंबईचे लोकसभा (Mumbai South Central Constituency) उमेदवार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांचा प्रचार करणार आहेत. मागील काही दिवसांपासून कालिदास कोळंबकर कॉंग्रेसला (Congress) रामराम ठोकणार का? अशा चर्चांना उधाण आलं होतं. अखेर आता कालिदास कोळंबकरांनी आपला युतीचा उमेदवार राहुल शेवाळेंना पाठिंबा असल्याचं जाहीर केलं आहे. काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर म्हणतात, '..म्हणून बॅनरवर छापला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो'
एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या रिपोर्टनुसार, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसारच कालिदास कोळंबकर राहुल शेवाळेंचा प्रचार करणार आहेत. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख 'बॉस' असा केला असून त्यांनी भविष्यात भाजपाप्रवेशाचेही संकेत दिले आहेत. देवेंद्र फडणवीसांचे कौतुक केल्याने कॉंग्रेस पक्ष माझ्यावर नाराज आहे. त्यांनी मला पक्षाबाहेर केलं असून आपण लोकसभेच्या निवडणूकीदरम्यान राहुल शेवाळेंना पाठिंबा देणार असल्याचे सांगितले आहे. तसेच राहुल शेवाळे आगामी लोकसभा निवडणूकीत विजयी होतील अशा विश्वास व्यक्त करताना भाजपा प्रवेशाची घोषणा केली आहे.
कालिदास कोळंबकर हे वडाळा मतदार संघाचे विद्यमान आमदार आहेत. या मतदारसंघातून ते सहा वेळेस निवडून आले आहेत. काही दिवसांपूर्वी दादर येथे टिळक ब्रीजवरही कोळंबरांनी पोस्टरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लावला होता त्यानंतर चर्चेला उधाण आलं होतं.