Sunil Kedar: काँग्रेस नेते सुनील केदार यांची आमदारकी रद्द, नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी दोषी आढळल्याने झाली कारवाई

नागपूर पोलिसांनी विधीमंडळाला सुनील केदार यांच्या शिक्षेची माहिती दिली असून कोर्टाचे आदेश पाठवले होते.

नागपूर (Nagpur)  जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी (Bank Scam) काँग्रेस नेते  सुनील केदार (Sunil Kedar) यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मायग्रेनचा (Migraine) त्रास होत असल्याने शुक्रवारी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आता त्यांच्या चाचण्या सुरू आहेत. केदार यांचा इसीजी देखील काढण्यात आला असून त्यांच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत. त्यांचा ईसीजी अ‍ॅबनॉर्मल असल्याने अजून काही चाचण्या घेऊन त्यांच्यावर पुढील उपचार ठरवले जाणार असल्याची माहिती आहे. दरम्यान सुनील केदार यांना दोषी ठरवल्यानंतर सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे.  नागपूर पोलिसांनी विधीमंडळाला सुनील केदार यांच्या शिक्षेची माहिती दिली असून कोर्टाचे आदेश पाठवले होते. त्यानंतर विधीमंडळाने केदार यांच्या आमदारकीचा निर्णय घेण्यात आला आहे.  (हेही वाचा - Sunil Kedar Health Update: सुनील केदार मायग्रेनमुळे ऑक्सिजनवर, सोमवार पर्यंत रूग्णालयातच राहण्याची शक्यता)

2001-2002 मध्ये नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने होम ट्रेड लिमिटेड, इंद्रमणी मर्चंट्स प्रायव्हेट लिमिटेड, सेंचुरी डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड, सिंडिकेट मॅनेजमेंट सर्विसेस आणि गिलटेज मॅनेजमेंट सर्विसेस या खाजगी कंपन्यांच्या मदतीने बँकेच्या रकमेतून सरकारी रोखे (शेयर्स) खरेदी केले होते.  मात्र, पुढे या कंपन्यांकडून कधीच बँकेला खरेदी केलेले रोख मिळाले नाही, ते बँकेच्या नावाने झाले नव्हते.