Congress Leader Eknath Gaikwad Passes Away: काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांचे निधन

ते 80 वर्षांचे होते. त्यांची कोरोना व्हायरस (Coronavirus) चाचणी पॉझिटीव्ह आली होती. त्यांच्यावर मुंबई येथील ब्रिच कँडी (Breach Candy Hospital) रुग्णालयात उपचार सुरु होते.

Eknath Gaikwad | (Photo Credit: Facebook)

काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड (Eknath Gaikwad Passes Away) यांचे निधन झाले आहे. ते 80 वर्षांचे होते. त्यांची कोरोना व्हायरस (Coronavirus) चाचणी पॉझिटीव्ह आली होती. त्यांच्यावर मुंबई येथील ब्रिच कँडी (Breach Candy Hospital) रुग्णालयात उपचार सुरु होते. आज (बुधवार, 28 एप्रिल) सकाळी 10 वाजता उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. प्रदीर्घ काळ ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते. तसेच, त्यांनी अनेक वेळा आमदार, खासदार आणि मंत्रीपद भूषवले आहे. महाराष्ट्राच्या विद्यमान शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांचे ते वडील होत.

मुंबईतील धारावी सारख्या झोपडपट्टी आणि तळागाळातील नागरिकांचे नेतृत्व करणारा नेता अशी त्यांची ओळख होती. ते दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून ते 2 वेळा काँग्रेस खासदार म्हणून निवडूण आले होते. एकनाथ गायकवाड यांनी शिवसेना नेते आणि तत्कालीन लोकसभा सभापती मनोहर जोशी यांचा दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून पराभव केला होता. या पराभवामुळे एकनाथ गायकवाड हे जायंट किलर ठरले होते. काही वर्षांनी शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांच्याकडून एकनाथ गायकवाड यांना पराभव स्वीकारावा लागला होता.

अत्यंत साधी राहणी असलेले एकनाथ गायकवाड हे मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते होते. राजकारणाच्या साठमारीत त्यांनी काँग्रेसवरची निष्ठा ढळू दिली नाही. नेहमी ते काँग्रेस विचारातच वावरले. धारावीसारख्या झोपडपट्टी असलेल्या मतदारसंघावर त्यांनी आपली पकड कायम ठेवली. दलित चळवळ आणि तळागाळातील नागरिकांशी त्यांचा थेट संपर्क होता. धारावीतील अनेक चाळींमधील लोक हे त्यांना थेट नावाने ओळखत असत. रिपब्लिकन नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.

एकनाथ गायकवाड यांच्या रुपात काँग्रेस आणि तळागाळातील नागरिकांना जोडणारा एक दुवा आपल्यातून निघून गेला अशी भावना काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. एकनाथ गायकवाड