संघ विचारांशी बांधिलकी ठेवणाऱ्या सर्व कुलगुरुंची नियुक्ती रद्द करा: आशिष देशमख
त्यामळे जेएनयूमधील हिंसाचारास कुलगुरु जगदीश कुमार यांचा पाठिंबा असल्याचा आरोपही देशमुख यांनी केला आहे. द
दिल्ली येथील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (Jawaharlal Nehru University) घडलेल्या हिसांचारांच्या घटनांची पुनरावृत्ती जर टाळायची असेल तर, संघ विचारांशी बांधिलकी ठेवणाऱ्या कुलगुरुंची विविध विद्यापीठांतून नियूक्ती रद्द करावी अशी मागणी काँग्रेस नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी केली आहे. संघ विचारांपासून देशाला धोका आहे. त्यामुळे संघ विचारांशी बांधीलकी ठेवणाऱ्या सर्व कुलगुरुंची नियुक्ती राज्यातील विद्यापीठांतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray ) यांनी रद्द करावी अशी मागणीही देशमुख यांनी केली आहे.
दिल्लीतील जेएनयूमधील कुलगुरु जगदीश कुमार हे देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विचारांशी बाधिलकी ठेवणारे आहेत. त्यामळे जेएनयूमधील हिंसाचारास कुलगुरु जगदीश कुमार यांचा पाठिंबा असल्याचा आरोपही देशमुख यांनी केला आहे. दरम्यान, राज्यातही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अनेक विद्यापीठांमध्ये कुलगुरुच्या नियुक्त्या करण्यात आल्या. हे कुलगुरु संघ विचारांशी बांधीलकी ठेवणारे आहेत. त्यामुळे त्यांची नियुक्ती रद्द करण्यात यावी, असे आशिष देशमुख यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, JNU Attack: जेएनयू हल्ला प्रकरणातील हल्लेखोरांची ओळख पटली; सरकारी सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांचा दावा)
दरम्यान, कोणत्याही विद्यापीठातील कुरगुरुंची नियुक्ती ही निवड समितीच्या शिफारसींनुसार करण्यात येते. त्यासाठी कुलगुरु पदासाठी इच्छुक उमदेवारांकडून अर्ज मागविण्यात येतात. कुरुगुरु पदासाठी पात्र असलेली पात्रता आणि निकष पाहूनच ही नियुक्ती करण्यात येते. तसेच, कुलगुरु पदासाठी रितसर जाहिरातही दिली जाते. कुलगुरुंची निवड करणारी समिती ही राज्यपालांच्या सूचनेनुसार स्थापन होते. ही समिती कुलगुरु पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेते. त्यानंतरच ही समिती काही नावे सूचवते त्यावर राज्यपाल निर्णय घेतात.