Deglur Assembly by Election Result: देगलूर-बिलोली काँग्रेसच्या पंजात, जितेश अंतापूरकर यांचा दणदणीत विजय; भाजपला झटका
देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणूक निकाल (Deglur Assembly by Election Result) भाजपसाठी भलताच धक्कादायक ठरला आहे. देगलूर बिलोली मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस (Congress) उमेदवार जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) यांचा दणदणीत विजय झाला आहे.
देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणूक निकाल (Deglur Assembly by Election Result) भाजपसाठी भलताच धक्कादायक ठरला आहे. देगलूर बिलोली मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस (Congress) उमेदवार जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) यांचा दणदणीत विजय झाला आहे. जितेश अंतापूरकर यांनी भाजप (BJP) उमेदवार सुभाष साबणे (Subhash Sabne) यांच्यावर 41,933 हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे.
देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी भाजपने इथेही इनकमिंग प्रयोग केला. त्यासाठी शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांचा भाजप प्रवेश घडवून आणला. मात्र, इथे भाजपची ही खेळी यशस्वी होऊ शकली नाही. भाजप उमेदवार सुबाष सबणे यांना तब्बल 41 हजारांच्या फरकाने पराभव पाहावा लागला आहे. ही निवडणुक भाजप आणि काँग्रेस अशा दोन्ही बाजूंनी प्रतिष्ठेची करण्यात आली होती. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीप्रमाणेच देगलूर बिलोली मतदारसंघातही विजय मिळेल असा दावा भाजपकडून केला जात होता. मात्र, हा दावा फोल ठरला आहे. (हेही वाचा, Deglur-Biloli Assembly By-election: भाजपला आघाडी द्या, गाव जेवण देईन, चंद्रकात पाटील यांची ऑफर)
देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी सभा घेतल्या होत्या. मात्र, त्याचा काहीच परिणाम दृश्य स्वरुपात दिसला नाही. उलट अशोक चव्हाण यांनी मात्र आपले वर्चस्व दाखवून देत नांदेड हा आपला बालेकिल्ला असल्याचे पक्के केले आहे. या निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी जोरदार लक्ष घातले होते. त्यांच्यासाठी ही निवडणूक अस्थित्वाची लढाई मानली जात होती. (हेही वाचा, Dadra & Nagar Haveli Bypoll: दादरा-नगर हवेलीवर शिवसेनेचा भगवा, कलाबेन डेलकर यांचा 47,000 मतांनी दणदणीत विजय; भाजप, काँग्रेस धक्क्याला)
देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुक निकाल (उमेदवारनिहाय)
- जितेश रावसाहेब अंतापूरकर (काँग्रेस)- 1, 08, 789
- सुभाष पिराजीराव साबणे (भाजप)- 66, 872
- उत्तम रामराव इंगोले (वंचित बहुजन आघाडी)- 11, 347
- मारुती लक्ष्मण सोनकांबळे (अपक्ष)-465
जितेश अंतापूरकर यांनी सकाळपासून म्हणजेच टपाली मतदान सुरु झाल्यापासूनच आघाडी घेतली होती. टपाली मतदानात अंतापूरकर यांना 51 मते मिळाली. तर, सुभाष साबणे यांना 35, उत्तम इंगोले-1, विवेक सोनकांबळे-2
टपाली मतदानातही जितेश अंतापूरकर यांना 51 मतं मिळाली. तर सुभाष साबणे यांना 35, उत्तम इंगोले यांना एक मत मिळाले. संपूर्ण निवडणुकीत 1,103 मतदारांनी नोटाला पसंती दिली.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)