Maha Vikas Aghadi Government: महाविकासआघाडी सरकारमध्ये आमदार विरुद्ध खासदार, कॅबिनेट मंत्री विरुद्ध राज्यमंत्री संघर्ष; एकाची टीका, दुसऱ्याकडून हक्कभंग
महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारमध्ये सर्व काही अलबेल आहे असे सांगितले जात असले तरी अंतर्गत संघर्ष लपून राहिला नाही. काही ठिकणी आमदार विरुद्ध खासदार असा तर मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री विरुद्ध राज्यमंत्री असा सामना पाहायला मिळत आहे.
महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारमध्ये सर्व काही अलबेल आहे असे सांगितले जात असले तरी अंतर्गत संघर्ष लपून राहिला नाही. काही ठिकणी आमदार विरुद्ध खासदार असा तर मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री विरुद्ध राज्यमंत्री असा सामना पाहायला मिळत आहे. दापोलीचे शिवसेना आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुनील तकटरे ( Sunil Tatkare) यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव (Privilege Motion) दाखल केला आहे. तर दुसऱ्या बाजूला कॅबिनेट मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्या विरुद्ध राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) असा संघर्ष पाहायाल मिळत आहे.
खासदार विरुद्ध आमदार
शिवसेना आमदार योगेश कदम यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे खा. सुनील तटकरे यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव दिला आहे. योगेश कदम यांचा आरोप आहे की, खा. सुनील तटकरे हे दापोली मतदारसंघात वारंवार शासकीय कार्यक्रम घेत आहेत. विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करत आहेत. मी या मतदारसंघातील आमदार असतानाही ते मला निमंत्रण देत नाहीत. शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका परस्परच घेत आहेत. या आधी राज्यमंत्री आदिती तटकरे यांनीही काही अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या आहेत, असा आरोप आमदार योगेश कदम यांनी घेतला आहे. (हेही वाचा, Geeta Jain: मीरा-भाईंदरमध्येही भाजपला मोठा झटका बसण्याची शक्यता; अपक्ष आमदार गीता जैन उद्या शिवसेनेत करणार प्रवेश)
कॅबीनेट मंत्री विरुद्ध राज्यमंत्री
राज्यमंत्री बच्चू कडू विरुद्ध कॅबिनेट शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. या संघर्षासाठी निमित्त ठरले आहे बेकायदा फी वसूल करणाऱ्या सेंट जोसेफ पनवेल आणि सेंट फ्रान्सिस स्कूल नाशिक या शाळांची तपासणी करण्याबाबतचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिलेले आदेश. प्राप्त माहितीनुसार, राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बेकायदा फी वसूल करणाऱ्या शाळांची तपासणी करण्याचे आदेश दिले. दरम्यान, या शालांची तपासणी स्थगित करण्याबाबत कॅबिनेट शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड बैठक बोलवली. त्यानंतर बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने शिक्षणमं६ी वर्षा गायकवाड यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. शिक्षणमंत्र्यांना विद्यार्थी आणि पालकांपेक्षा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना संस्थाचालकांचा कळवळा आहे का? असा सवाल प्रहास संघटनेने उपस्थित केला आहे.
दरम्यान, या आधीही काही मंत्र्यांमध्ये एकमेकांबद्दल गैरसमज किंवा संवादाचा अभाव आढळून आला होता. सदोष पीपीई कीट वरुन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे बोट दाखवले होते. महाविकासआघाडीमधील इतरही काही मंत्र्यांमध्ये मतमतांतरे दिसून आली होती.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)